Join WhatsApp group

Ads

-

अकोला मार्गावरील पहिल्या मेमूला पाच वर्षे पूर्ण

By Sarkarmzanews

January 31, 2025 7:11 pm

Ads

दिनांक ३१: अकोला : अकोला मध्य रेल्वेच्या भुसावळ – बडनेरा – अमरावती विभागात पूर्वी भुसावळ – अमरावती पॅसेंजर धावत होती. या रेल्वेचे नरखेडपर्यंत विस्तारीकरण करण्यात आले आणि १ फेब्रुवारी २०२० रोजी ती मेमू ट्रेन म्हणून कार्यान्वित झाली.

कोरोना नंतर सद्यस्थितीत ही मेमू केवळ बडनेरा पर्यंत धावत आहे. अकोला मार्गावर सुरू झालेली ही पहिली मेमू रेल्वे आहे.ही मेमू रेल्वे भुसावळ – बडनेरा विभागातील प्रवाशांसाठी स्वस्त, सोयीस्कर आणि आरामदायी प्रवासाची सुविधा पुरवणारी सेवा म्हणून लोकप्रिय ठरली आहे. विशेषतः लहान स्थानकांवरील प्रवाशांसाठी ही रेल्वे ये-जा करण्यासाठी उत्तम पर्याय ठरली आहे.

त्यांच्या दैनंदिन प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे. नियमित, वेळेवर आणि परवडणारी सेवा पुरवणारी ही रेल्वे भुसावळ विभागाच्या उत्कृष्ट वाहतूक व्यवस्थेचे प्रतीक मानली जाते.

१ फेब्रुवारी २०२० रोजी भुसावळ – नरखेड मेमू गाडीचे अकोला स्टेशनवर उत्साहात स्वागत करण्यात आले होते.

त्यावेळी स्टेशन प्रबंधक श्री. ए. एस. नांदुरकर, उप स्टेशन प्रबंधक श्री. आर. एस. उंबरकर, कार्यालय अधीक्षक श्री. अब्दुल मुश्ताक, मुख्य स्वच्छता निरीक्षक श्री. प्रशांत डोंगरे, श्री. यासीम सोहेल खान, श्री. राजेश यादव, श्री. सदानंद क्षीरसागर, श्री. मोहन मारोती आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!