Join WhatsApp group

Ads

जिने मोठं केलं, वाढवलं तिलाच त्याने जीवे मारलं; आईच्या डोक्यात हंडा घालून मुलाने केली हत्या

By Sarkarmzanews

January 13, 2025 9:36 am

Ads

दिनांक १३ : प्रतिनिधी सातारा :  गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. क्षुल्लक कारणांवरून खून, खुनाचा प्रयत्न, बेदम मारहाण यांसारखे प्रकार होत आहेत. असे असताना आता जेवण न वाढल्याने संतापलेल्या मुलाकडून आईची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील दहिवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिंगळी बुदुग गावात शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संगीता जाधव (वय ५२) घरात झोपल्या असताना मुलगा विशाल जाधव (वय ३२) दारू पिऊन घरी आला आणि जेवण वाढण्यास सांगितले. परंतु, खूप उशीर झाल्यामुळे आईने ‘तू तुझे वाढून घे’, असे म्हटले.

यावरूनच त्याने आईला शिवीगाळ, मारहाण करण्यास सुरूवात केली. घरातील स्टीलच्या हंड्याने आईच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी साताऱ्यात आणण्यात आले. परंतु, यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

पोटच्या मुलाने गाठली क्रूरतेची परिसीमा

या घटनेची माहिती मिळताच दहिवडीच्या पोलिस उपअधीक्षक अश्विनी शेंडगे यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेमुळे माण तालुक्यात मोठी खळबळ माजली आहे. पोटच्या मुलाने क्रुरतेची परिसीमा गाठल्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आरोपी विशाल आनंदराव जाधव हा लपून बसला होता. त्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक यशवंत जामदार यांच्या पथकाने शोधून काढले आणि ताब्यात घेतले. दरम्यान, आरोपीला कोर्टात हजर केले असता त्याला न्यायाधीशांनी पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती मिळाली आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!