Join WhatsApp group

Ads

-

गुटखा माफियांचा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांना आव्हान? – ऑपरेशन ‘प्रहारचा’ फज्जा

By Sarkarmzanews

May 30, 2025 9:46 am

Ads

दिनांक ३० : अकोला : अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक पदावर जेव्हा पासून श्री अर्चित चांडक रुजू झाले तेव्हा पासून अकोला जिल्ह्यात सामान्य जनतेचा व पोलीस खात्यातील कर्तृत्ववान पोलीस अधीकार्यांचा आशा अपेक्षा वाढल्या आहे की आता तरी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सुधरेल.

तसेच श्री अर्चित चांडक यांनी पदभार सांभळल्या नंतर जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकार्यांची मिटिंग घेऊन त्यांना कोणत्या पद्धतीने काम करावे हे लक्षात आणून दिले, त्या मध्ये मुख्य गौ मास तस्करी व विक्री, तसेच अमली पदार्थान वर बंदी असे अनेक मुद्दे होते.

ऑपरेशन ‘प्रहारचा’ जिल्ह्यात वाजागाजा होत असताना ऑपरेशन प्रहार अंतर्गत गुटखा हा अमली पदार्थाचा अंतर्गत येत नाही का ? अशी चर्चा सध्या जिल्ह्यात सुरु आहे.

पोलीस अधीक्षक जरी नवीन असेल जिल्ह्यातील प्रत्येक ठाणेदारांना, व इतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना याचा विसर पडला आहे का ? असे प्रश्न सध्या उपस्थीत होत आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक गावात गुटखा हा भाजीपाल्या सारखा सर्रासपने विक्री होत आहे, ज्या मुळे तरुण पिढि व्यसनाधिन झाली आहे.

अकोला शहरात सध्या गुटखा माफिया म्हणून रामू शेवाडे , वाहिद , सन्नी ट्रेडर्स, गुलशन दुलानी, अनिस किराणा, भगवती ट्रेडर्स, विनोद अग्रवाल या नावांची शहरात उघड पने चर्चा आहे.

तसेच बोरगाव मंजू शहरातील मुजम्बील हा तर मुख्य सूत्रधार असून अमरावती येथून येणारा बनावट गुटखा हा बोरगाव मधून संपूर्ण जिल्ह्यात वितरीत करणारा पुष्पा तर संपूर्ण जिल्ह्यात फेमस आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, बोरगाव आणि माना येथून दररोज तब्बल लाखो रुपयांचा बनावट गुटखा विक्रीसाठी अकोला जिल्ह्यात पाठवला जात आहे.

विशेष म्हणजे, अमरावतीतील कुख्यात गुटखा माफिया जावेद याचा या व्यवहारामध्ये हात असल्याची माहितीही पुढे येत आहे.

तो तर चक्क बनावट गुटखा उत्पादन करून विक्री करतो, असे जगजाहीर आहे.

अकोला जिल्ह्यात बोरगाव शहर हे गुटख्याचा हॉट स्पॉट बनला आहे.

अकोला शहरातील पोलीस स्टेशन, बोरगाव पोलीस स्टेशन, मूर्तिजापूर ग्रामीण व शहर पोलीस स्टेशन तसेच माना पोलीस स्टेशन व जिल्ह्यातील इतर पोलीस स्टेशन अंतर्गत व्यापार करीत असून यावर एकही कारवाई का होत नाही?

तर सूत्रांच्या मते या भागातील अन्न औषध अधिकार्‍यांचे या माफियाशी साटेलोटे असल्याचा संशय आहे असे असताना.

अकोला स्थानिक गुन्हे शाखेला सर्व माहिती असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. या निष्क्रियतेमुळे गुटखा माफियांचे मनोबल अधिकच वाढले आहे.

या नकली गुटख्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील तरुण पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत असून, सार्वजनिक आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे.

लक्ष्मी दर्शनामुळे अन्न व औषध प्रशासनाचा या माफियांन वर संपूर्ण पणे दुर्लक्ष आहे अशी चर्चा नेहमी जनतेत असते.

पण यावर पोलीस अधीक्षक अर्चित चांडक काही कारवाई करून तरुण पिढिला या व्यसनातून मुक्त करणार का ? अशी चर्चा सध्या जिल्ह्यात रंगली आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!