Join WhatsApp group

Ads

शहरात दोन ठिकाणी गोवंशाना जीवन दान – आ. हरीश पिंपळे आणि पोलिसांना यश

By Sarkarmzanews

January 3, 2025 9:49 am

Ads

मुर्तीजापुर – दि. ३ : सध्या आ. हरीश पिंपळे आणि पोलीस यंत्रणा कत्तल खाने चालवनार्यानवर बारीक लक्ष ठेउन आहे. या साठी बजरंगदल आणि काही हिंदू संघटना या विषया वर लक्ष ठेऊन पोलिसांची मदत करताना दिसत आहे.

शहरात सध्या कत्तल खाणे चालवनार्यानवर कारवाया वाढल्या आहेत, तरी गो हत्या करणार्यांनी आता आपले व्यवसाय थांबवावेत अन्यथा तो कोणी पण असो त्याला कारवाई केल्या शिवाय सोडणार नाही असा इशारा आ. हरीश पिंपळे यांनी दिला आहे.

काल दिनांक २ जनवरी रोजी आ. हरीश पिंपळे गायरान जवळ आपल्या शेतात फेरफटका मारत असताना एक संशयास्पद गाडी दिसली त्या गाडी मध्ये २ इसम गोवन्शाला गाडीत चढवीत होते आ. हरीश पिंपळे व त्यांचा सहकारीना पाहता गोवंशाला सोडून तेथून पडाले, या विषयाची माहिती ग्रामीण पोलीस स्टेशन ला देण्यात आली व पोलसांनी अज्ञात इसमान वर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहे. व गोवंशांना पुंडलिक बाबा गोरक्षण संस्थेत संगोपनासाठी देण्यात आले.

तसेच या प्रकरणा नंतर शहरात हि बातमी वाऱ्या सारखी पसरली व शहर पोलिसांना गायरान जवळ शहर पोलीस स्टेशनचा हद्दीत मातोश्री पेट्रोल पंप जवळ काही गोवंशाची तस्करी होणार आहे असे माहित पडले तत्काळ psi आशिष शिंदे यांनी घटना स्थळी धाव घेतली व एका झाडा खाली गोवंश बांधून ठेवले होते आणि एक इसम त्या ठिकाणी चकरा घालत होता त्याला विचारपूस केल्यास त्याने उडवा उडवी चे उत्तर दिले त्या वरून कसून चौकशी केल्या नन्तर त्याने हकीकत सांगतली व त्या इसमाला ताब्यात घेत कारवाई केली व गोवंशांना पुंडलिक बाबा गोरक्षण संस्थेत संगोपनासाठी देण्यात आले.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!