Join WhatsApp group

Ads

मुर्तीजापुर ग्रामीण पोलीस स्टेशनचा हद्दीत खुल्या पद्धतीने जुगाराचा शाहीखेळ

By Sarkarmzanews

December 23, 2024 7:34 am

Ads

मुर्तीजापुर : दि.२३ : गेल्या काही वर्षात तरुणाई मध्ये वाढत असलेल्या कमी गुंतवणूक करून जास्त नफा कमविण्याचा मानसिकते मुळे अनेक तरुणांचा जुगारा कडे कल वाढला आहे, मुर्तीजापुर शहरातली तरुण मंडळी या जुगाराचा जाळ्यात मोठ्या प्रमाणात ओढली जात आहे.

तरुणांचा या जुगारा कडे वाढलेला कल आणि पोलीस प्रशासना कडून दिलेली सुट म्हणजेच दुर्लक्ष या जुगार मालकाला जणू काही मोकळे रान मिळाले आहे. दरम्यान जुगाराला ग्रामीण विभागात सध्या पूर आलेला दिसत आहे, मुर्तीजापुर ग्रामीण पोलीस स्टेशनचा अंतर्गत येणाऱ्या एक जुगार अड्डा खुले आम चालताना दिसत आहे. मात्र ग्रामीण पोलीस स्टेशन कडून या वर जाणीव पूर्वक दुर्लक्ष होत आहे.

मुर्तीजापुर ग्रामीण पोलीस स्टेशनचा हद्दीत कंझरा रोडचा लगत एका शेतात शाही पद्धतीने जुगार सुरु असल्याची चर्चा शहरात सध्या चर्चेचा विषय बनली आहे. या जुगार अड्ड्यावर जुगार प्रेमींना सगळी सोय पुरवली जात असल्याची चर्चा सध्या जोरावर सुरु आहे.

कित्येक महिन्यान पासून येथे जुगार खुल्या पद्धतीने सुरु असून ग्रामीण पोलीस स्टेशन या वर डोळे झाकून आहे. सूत्रांचा माहिती प्रमाणे ग्रामीण पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेला जुगार अड्ड्याचे मालक लक्ष्मि दर्शन प्रत्येक महिन्याला मोठ्या प्रमाणात करून मोकळे होतो. त्या आधारे कोणाचे भय न बाळगता क्लब चा मालक निर्भय होऊन तरुण मंडळीला जुगारचा नांदी लावत आहे. या जुगाराचा नादात तरुण मंडळी देशोधडीला लागली असून कर्ज बाजारी होऊन नैराश्याचा जीवन जगत आहे.

जबाबदार अधिकारी व लोकप्रतिनिधींनी या वर लक्ष देणे गरजेचे आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!