Join WhatsApp group

Ads

श्री राजराजेश्वर प्रेरणा मंडळाच्या वतीने प्रयागराज येथे येणाऱ्या भक्तांसाठी मोफत अखंड अन्नदान सत्र.

By Sarkarmzanews

January 28, 2025 12:36 pm

Ads

दिनांक २८ : अकोला : श्री.राज राजेश्वर मंदिरामध्ये अन्नदान सत्र सातत्याने सुरू ठेवलेल्या श्री राज राजेश्वर प्रेरणा मंडळाच्या वतीने प्रयागराज येथे सुद्धा कुंभ मेळाव्यासाठी येणाऱ्या भावीक भक्तांसाठी अखंड मोफत अन्नदान सत्र दिनांक 9/ 12/ 2024 ते 5/ 2/2025 पर्यंत सुरू केले आहे.

तसेच भक्तांची राहण्याची व्यवस्था सुद्धा पेंडॉल टाकून करण्यात आली आहे. त्यासाठी नुकताच अकोला येथून अन्नधान्य किराणा घेऊन जाणाऱ्या तिसऱ्या ट्रकला रवाना करण्यात आले आहे .या ट्रकला भगवा झेंडा दाखवून रावांना करण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांच्या शुभहस्ते तर समाजसेवक गजानन हरणे यांच्या शुभहस्ते राज राजेश्वर प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी नंदकिशोर गावंडे, प्रमोद धर्माळे, डॉ.कृष्णकांत वक्टे, बाबुरावजी खोपकार, संजय असमोल, कैलास निळे, गजानन बेदळकार, संजय गिरी, राजेश निंबाळकर, गजानन घुसे, बळीराम बडे, विनायक देशमुख, आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा ट्रक अन्नधान्य किराणा घेऊन तसेच सेवाधारी घेऊन रवाना झाला आहे.

यावेळी सर्वप्रथम समाजसेवक गजानन हरणे यांच्या शुभ हस्ते राजराजेश्वर प्रतिमेचे पूजन व हारअर्पण करण्यात आले .त्यानंतर अकोला शिवसेना जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांच्या शुभहस्ते भगवा ध्वज दाखवून ट्रकला प्रयाग राज कडे रवाना करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांच्यासह अनेक दान दात्यांनी, लोकांनी प्रयागराज कुंभ मेळावा मध्ये हे अन्नदान सत्र सुरू राहण्यासाठी भरीव मदत केली. त्याबद्दल सर्व अन्न दानदात्याचे प्रेरणा मंडळाच्या वतीने नंदकिशोर गावंडे यांनी आभार व्यक्त केले.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!