Join WhatsApp group

Ads

देशी दारूचा दुकानाला नाही वेळेचे नियम?-जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष

By Sarkarmzanews

December 5, 2024 12:07 pm

Ads

प्रेमराज शर्मा : अकोला, दिनांक ०५ :मद्याच्या नशेत भावी पिढी उद्ध्वस्त होत आहे. असे असतानाही निव्वळ महसूल मिळतो म्हणून राज्य शासनाकडून स्वत:च्या नियमांनाच पायदळी तुडवले जात आहे. शहरातील देशी-विदेशी दारूची दुकाने सकाळी 10 वाजेनंतर उघडण्यात यावीत, असा शासकीय नियम आहे.

प्रत्यक्षात मात्र, सकाळी तांबडे फुटत नाही तोच तळीरामांची सोय होताना दिसत आहे. जिल्ह्यात स्थानिक पातळीवरील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे याकडे होणारे दुर्लक्ष म्हणा किंवा आर्थिक संबंधांचा परिणाम, सकाळपासूनच शहरात राजरोसपणे मद्याची विक्री केली जात असल्याचे सरकार माझा न्यूजचा पाहणीत दिसून आले आहे.

सामान्यांना कायद्याचा धाक दाखवणारे जिल्ह्यातील स्थानिक पोलिस मात्र देशी दारू दुकानांविरोधात कारवाई करताना ‘डगमगताना’ दिसत आहेत. यामुळे सामान्यांना मद्यपींच्या जाचाला सामोरे जावे लागत आहे. देशी दारूसाठी व्यसनमुक्ती धोरण व उत्पादन शुल्क विभागाच्या कायद्यांना मूठमाती दाखवण्याच्या प्रकारावर सरकार माझा न्यूजचा प्रकाशझोत..

काय आहे शासनाचा प्रमाणे दुकानांच्या वेळा –
> वॉइन शॉप (एफएल-2 अनुज्ञप्ती)- सकाळी 10 ते रात्री 10.30 पर्यंत.

> परमिटरूम (एफएल-3 अनुज्ञप्ती)- सकाळी 11.30 ते पहाटे 1.30 वाजेपर्यंत. (मुंबई, ठाणे व पोलिस आयुक्त कार्यक्षेत्र, महापालिका हद्द) (नाशिकमध्ये रात्री 11.30 पर्यंत)

> परमिटरूम (एफएल- 3)- मनपा हद्द वगळून इतर ठिकाणी स. 11.30 ते 11.30.

> देशी दारू विक्री (सीएल-3 अनुज्ञप्ती)- सकाळी 10 ते रात्री 12. (मनपा हद्द)

> बिअरबार फार्म ‘ई’- सकाळी 9 ते रात्री 12.

> विदेशी दारू विक्री होलसेल गुदाम (एफएल-1 अनुज्ञप्ती) स. 10 ते रात्री 8.

> विदेशी मद्यनिर्मिती, आसवणी (फार्म आय)- सकाळी 8 ते सायंकाळी 5.30.

> देशी मद्यनिर्मिती (सील-1) सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.30.

> बिअर निर्मिती (बीआरएल)- 9 ते सायंकाळी 5.30.

नियमांचे पालन करावेच लागेल का ?
शहरातील मद्यविक्रेते असोसिएशन किंवा परमिटरूमचालक, सर्वांनी उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार दुकाने उघडण्याच्या व बंद करण्याच्या वेळांचे पालन करणे बंधनकारक आहे का ? मुळात मद्यविक्री व्यवसाय शासनाच्या वेगवेगळ्या करांमधील वाढीमुळे करणे कठीण आहे. तरी व्यवसाय करणार्‍यांनी कायद्याचे उल्लंघन का करत आहे? जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभाग का बर या वर कारवाई नाही करत? असे अनेक प्रश्न राज्य उत्पादन शुल्क विभागा वर उपस्थित होतात.

सरकार माझा न्यूज – जनहितार्थ अर्पण……

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!