Join WhatsApp group

Ads

शहरात अल्पवयीन मुलांन मध्ये नशा खोरीचे प्रमाण वाढल्यामुळे होत आहे गुन्हे – नागरिकांन मध्ये चर्चा १७ वर्षीय तरुणाची दगडाने ठेचुन हत्या – चौथा आरोपी पोलिसांचा हाती

By Sarkarmzanews

January 5, 2025 9:48 pm

Ads

दिनांक : ०५ : चंद्रपूर शहरात ०३ जानेवारी रोजी एका १७ वर्षीय तरुणाची दगडाने ठेचुन हत्या करण्यात आली होती. मृतकाचे नाव तन्मय खानं असुन तो बाबुपेठ येथिल रहीवासी असल्याचा समोर आले होते. या प्रकरणात चंद्रपूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन आरोपींना अटक केली होती. परंतु चौथा आरोपि फरार होता. त्या फरार आरोपिला अटक करण्यात चंद्रपूर पोलिसांना यश आले आहे.

माहितीनुसार तन्मय हा नातेवाईकांना बसस्थानकावर घराकडे परतत असताना त्यांच्या दुचाकीने वाटेत काही अल्पवयीन मुलाच्या दुचाकीना धक्का लागला या मुळे चिडलेल्या चार मुलानी तन्मय सोबत वाद घातला आणि त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली,वाद इतका वाढला की बाबुपेठ रेल्वे फाटकाजवळील पटरिच्या परिसरात आरोपींनी तन्मयला जबरदस्त मारहाण केली या वेळी त्यांनी निर्भयतेने दगडांचा वापर करुन तन्मयची हत्या केली.

हत्याची कुर्रता एवडी होती कि तन्मयचा चेहरा देखील ओळखने कठिण झाले होते. या घटनेने संपूर्ण परिसरात भितिचे वातावरण पसरले होते.

घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर शहर पोलिस निरीक्षक सो.प्रभावती इकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर शहर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून तीन आरोपींना अटक करण्यात आली होती मात्र चौथा आरोपि फरार झाल्याने पोलिस त्याचा शोधात होते.

मात्र चंद्रपूर पोलिसांनी मोठ्या पातळीवर चौथ्या आरोपींचा शोध सुरु केला आरोपीला चंद्रपूर शहरातून दिनांक ०५ डिसेंबर रोजी अटक केले, पोलिसानी चौकशी दरम्यान सांगितले की हत्येचे नेमके कारण सध्या अस्पष्ट आहे.

पुढील तपास चंद्रपूर शहर पोलिस निरीक्षक सौ.प्रभावती इकुरके व त्यांची टीम करीत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!