Join WhatsApp group

Ads

-

दहीहांडा पोलिस स्टेशनचा भ्रष्ट पोलीस अधिकारी A.c.b. च्या ताब्यात

By Sarkarmzanews

January 28, 2025 7:43 pm

Ads

दिनांक २८ : अकोला : अकोला एसीबीने आज मंगळवार दिनांक २८/१/२०२५ ला सायंकाळी ५:३० ते ६:०० वाजताच्या दरम्यान केलेल्या कारवाईत  दहीहांडा पोलिस स्टेशनला कार्यरत पोलिस कॉन्स्टेबल प्रफुल्ल दिंडोकार आणि एक खाजगी इसम शंकर जानराव तरोळे हे जाळ्यात अडकले आहेत,तर एक पोलिस हेड कॉन्स्टेबल गणेश अवचार एसीबीच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे .

दहीहंडा पोलिस स्टेशनला जवळ असलेल्या हॉटेलमध्ये ही कारवाई करण्यात आली. एसीबीची ही कारवाई सुरू असताना ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे हे दहीहांडा पोलिस ठाण्यात हजर होते. मात्र कारवाईची माहिती मिळताच त्यांनी पोलीस ठाण्यातून पळ काढल्याची गावात चर्चा आहे.

एसीबीने केलेल्या कारवाईत पोलिस शिपाई प्रफुल्ल दिंडोकार, खाजगी इसम शंकर तरोळे यांचा वर दहीहांडा पोलिस स्टेशनलां गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

काय आहे प्रकरण ?

एन सी प्रकरणांत प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी तक्रार कर्त्याला ह्या पोलिस कर्मचाऱ्याने ८००० रुपयांची लाच मागितली होती.परंतु तक्रार करत्याला ती द्यावयाची नसल्याने त्याने अकोला एसीबीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तक्रार दिली होती.

एसीबीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पडताळणी कारवाईत लाचेची मागणी सिद्ध झाल्याने आज सापळा लावण्यात आला होता त्यात खाजगी इसमाच्या हातून लाचेची रक्कम घेत असताना सदरहू पोलिस कर्मचारी सहज सापडला असून दोघां विरुद्ध दहीहंड्याच्या पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

 सदरहू कारवाई अकोला एसीबीचे उप अधीक्षक मिलिंद बहाकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सचिन सावंत,कारवाई पथकातील पो.कॉ. प्रदीप गावंडे,दिगंबर जाधव व संदीप ताले यांनी केली.

Related Article

जनावरचोरांचा धुमाकूळ! पशुपालकांचा सवाल – पोलिसांना चोर सापडत नाहीत की शोधले जात नाहीत?

मुर्तीजापूर तालुक्यासाठी आमदार यांचे दिलासादायक निर्णय; आधुनिक आरोग्य सेवांचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर

मुर्तीजापूरात धान्य घोटाळ्याचा भूकंप ? तपास यंत्रणांच्या हालचालींनी वाढली उत्सुकता : रेशन व्यवस्थेतील काळे धंदे उघड होणार?

“ठाणेदार गेले बदलीवर… पण मुर्तिजापूरकरांच्या मनातून जाणार नाहीत अजित जाधव!”

बोरगाव मंजूचे ‘रतन खत्री’ कोण ? स्मारक परिसरातील अवैध धंद्यांमुळे चर्चांना उधाण

माना पोलिसांची गावठी हातभट्टी अड्ड्यावर धाड; ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी ताब्यात

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!