Join WhatsApp group

Ads

-

ए.टि.एम. मधील बॅटरी चोरी करणारा मुख्य आरोपीला अटक खदान पोलीस स्टेशनची कारवाई

By Sarkarmzanews

January 31, 2025 4:22 pm

Ads

अकोला : दिनांक ३१ : गेल्या काही दिवसा पासून ए.टि.एम. मधील बॅटरी चोरी करणारी एक टोळी सक्रीय झाली होती. पण खदान पोलीसांनी त्याचा शोध घेत आरोपीला अटक केली आहे. आरोपीचे ताब्यातुन एकुण २४ नग बॅटरी किंमत १,६८,०००/- रू चा माल जप्तदिनांक ०६/१०/२०२४ रोजी गौरक्षण रोड देवि प्लाझा कॉम्प्लेक्स मधील एस.बि.आय चे ए.टि.एम मधुन तीन अज्ञात चोरांनी बॅकरूम मध्ये ठेवलेल्या ६५ ए.एच च्या एक्साईड कंपणीच्या ०८ नग बॅटऱ्या असा एकुण किंमत अंदाजे ५५,०००/- रूपये च्या बॅटरीज सकाळी ०५/५४ मिनीटांनी चोरल्या होत्या. अशा तक्रारी वरून पो.स्टे. खदान येथे अपराध क्रमांक ७५२/२०२४ कलम ३०५, ३३४ (१), ३ (५) B.N.S प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतला.

सदर गुन्हयातील आरोपी भगवान विश्वनाथ सदार रा. ग्राम चतारी ता. पातुर जिल्हा अकोला यास अटक केली असता, त्यांने गुन्ह्यात चोरी केलेला बॅटऱ्या तसेच अकोला शहरातील पोस्टे सिव्हील लाईन अप.क. ४९४/२४ कलम ३३४ (१),३०५ बि.एन.एस गुन्ह्यातील ए.टि.एम. एकूण ६५ ए.एच च्या एक्साईड कंपणीच्या २४ नग बॅटऱ्या कि. अ.१,६८,०००/-रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.

तसेच यापुर्वी सदर गुन्ह्याचे तपासात आरोपी नामे १) राष्ट्रपाल दयाराम सदार वय २९ वर्ष, २) युवराज मोहन सदार दोन्ही रा. ग्राम चतारी ता. पातुर जि. अकोला यांना गुन्ह्यात अटक करून त्यांचे ताब्यातुन गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन १) पांढऱ्या रंगाचे चार चाकी सेन्ट्रो वाहण क एम.एच १४ एक्स ०१२७ २) चोरी केलल्या बॅटऱ्या पैकी ६५ ए.एच घ्या एक्साईड कं.०४ नग बॅटच्या किं. अं २८,०००/- रू असा मुदेमाल मिळून आला असा एकुण १,७८,०००/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

तरी सदरचे गुन्हयाचे तपासात आतापर्यंत १) भगवान विश्वनाथ सदार वय ३९ वर्षे, २) राष्ट्रपाल दयाराम सदार वय २९ वर्ष, ३) युवराज मोहन सदार तिन्ही रा. ग्राम चतारी ता. पातुर जि. अकोला यांना अटक करण्यात आली असुन त्यांचेकडुन आज पर्यंत १) पांढऱ्या रंगाचे चार चाकी सेन्ट्रो वाहण क एम.एच १४ एक्स ०१२७ किं.अं. १,५०,०००/- रू २) ६५ ए.एच च्या एक्साईड कं. २८ नग बॅटऱ्या किं. अं१,९६,०००/- रू असा एकुण ३,४६,००० /- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. श्री. बच्चन सिंग, पोलीस अधिक्षक अकोला, अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. अभय डोंगरे सा, मा.श्री. सतिष कुलकर्णी सा उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अकोला यांचे मार्गदशनाखाली मा श्री मनोज केदारे, पोलीस निरीक्षक पोरटे खदान पो.हे.कों निलेश खंडारे, पो.हे.का. अमित दुबे, पो.कों.अभिमन्यु सदांशिव, यांनी सदरची कारवाई केली आहे.

Related Article

जनावरचोरांचा धुमाकूळ! पशुपालकांचा सवाल – पोलिसांना चोर सापडत नाहीत की शोधले जात नाहीत?

मुर्तीजापूर तालुक्यासाठी आमदार यांचे दिलासादायक निर्णय; आधुनिक आरोग्य सेवांचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर

मुर्तीजापूरात धान्य घोटाळ्याचा भूकंप ? तपास यंत्रणांच्या हालचालींनी वाढली उत्सुकता : रेशन व्यवस्थेतील काळे धंदे उघड होणार?

“ठाणेदार गेले बदलीवर… पण मुर्तिजापूरकरांच्या मनातून जाणार नाहीत अजित जाधव!”

बोरगाव मंजूचे ‘रतन खत्री’ कोण ? स्मारक परिसरातील अवैध धंद्यांमुळे चर्चांना उधाण

माना पोलिसांची गावठी हातभट्टी अड्ड्यावर धाड; ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी ताब्यात

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!