Join WhatsApp group

Ads

आय एम ए डॉक्टर असोसिएशन व जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे जन आरोग्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम – 31 में जागातीक तम्बाखू विरोधी दिन निमित्य रैली

By Sarkarmzanews

May 29, 2025 6:41 pm

Ads

दिनांक २९ :अकोला : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत यावर्षी 31 मे रोजी “जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यात येणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने यावर्षीचे घोषवाक्य “आकर्षणाचा मुखवटा उतरूया”, “तंबाखू व निकोटीन च्या उ‌द्योगाच्या क्लुप्त्या उघड करूया या थीम संबंधित विषयावर जनजागृती रॅलीचे आयोजन जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, मुक्ती फाउंडेशन अकोला व आयएमए संघटना अकोला यांच्याद्वारे शनिवार दिनांक 31 मे 2025 रोजी सकाळी सात वाजता आय एम ए हॉल, आकाशवाणी समोर अकोला येथे करण्यात आले आहे.

या रॅलीचे उ‌द्घाटन जिल्हाधिकारी मा. डॉ अजित कुंभार यांच्या हस्ते होईल व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ तरंग तुषार वारे, डॉ संतोषकुमार सोमाणी अध्यक्ष आय एम ए अकोला, सचिव डॉ प्रदीप अग्रवाल, डॉ सोनल मोदी, डॉ मयूर अग्रवाल व डॉ गोविंद खंडेलवाल यांच्या प्रमुख उपस्थित होईल. सदर विषयाची जास्तीत जास्त प्रमाणात जनजागृती करण्याकरिता आशा सेविका व नर्सिंग महाविद्यालयां चे विद्यार्थी या रॅलीमध्ये सहभागी होतील.

तसेच 31 मे रोजी सकाळी दहा वाजता ऑडिटेरियम जीएमसी अकोला येथे मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात विविध मान्यवर डॉक्टर तंबाखू पासून होणारे दुष्परिणाम या विषयांवर उपस्थितना मार्गदर्शन करतील तसेच गव्हर्मेंट नर्सिंग कॉलेजच्या वि‌द्यार्थिनी लघु नाटिका सादर करतील. तंबाखूचे दुष्परिणाम व तंबाखू मुक्त अकोला या विषयावर चित्रकला, रील, स्लोगन, निबंध अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे व विजेत्या स्पर्धकांना बक्षीसे देऊन त्यांचा सन्मान करण्यात येई. या कार्यक्रमाचे उ‌द्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक मा. अर्चित चांडक करतील व प्रमुख उपस्थिती जीएमसी अकोला चे अधिष्ठाता डॉ मीनाक्षी गजभिये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ तरंगतुषार वारे तसेच आयएमए अकोला चे अध्यक्ष डॉ संतोषकुमार सोमाणी यांची राहील तरी सर्व नागरिकांना तंबाखू विरोधी रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन आयएमए अकोला चे अध्यक्ष डॉक्टर संतोषकुमार सोमानी यांनी केले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!