Join WhatsApp group

Ads

अकोला खदान पोलीस स्टेशन अंतर्गत जुगार कि जुगाड ?

By Sarkarmzanews

December 5, 2024 3:12 pm

Ads

न्यूज डेस्क : अकोला, दिनांक ०५ : जुगार खेळणं हा गुन्हा आहे. त्याच्या नादाला लागून अनेकांच आयुष्य उद्ध्वस्त होतं. भावी पिढीचंही या व्यसनामुळे भविष्य खराब होऊ शकतं. हे टाळण्यासाठी अकोला पोलिस अनेक वेळेस जुगार अड्ड्यांवर (Gambling) कारवाई करत असतात. मात्र अकोला शहरा मधून एक धक्कादायक माहिती व पुरावे सरकार माझा न्यूजचा हाती लागले आहे.

खदान पोलीस स्टेशनच्या हाकेचा अंतरा वर असलेल्या अब्द्दुला कॉलनी येथे रोज जुगारचा खेळ रंगत असतो, येथे शहरातील आणि बाहेर गावातील जुगार प्रेमी दररोज खेळाला हजेरी लावताना दिसतात, या जुगार प्रेमीना जुगार चालवणाऱ्या मालका कढून येण्या-जाण्याचे भाडे व स्नेह भोज व बाकीचा सोय सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.

वारंवार पोलीस प्रशासनाला याची माहिती नागरिकांन कळून प्राप्त झाली असता पण या वर अद्याप कोणती कारवाई का झाली नाही ?

दररोज येथे लाखो रुपायचा जुगार चालत असल्या मुळे पोलीस प्रशासनाच तर या मध्ये काही फायदा तर नाही ना?

अकोला पोलीस प्रशासन २४ तास सज्ज असून अब्द्दुला कॉलनी मधले काही जुगार व्यापारी पोलीस प्रशासना वेठीस तर धरत नाही ना ?

कि स्थानिक काही पोलीस प्रशासनाच संगनमताने हे जुगार सुरु आहे ?

असे अश्या अनेक चर्चा सध्या खदान परिसरात रंगल्या आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!