Join WhatsApp group

Ads

-

अकोला जिल्ह्यात अवैध पद्धतीने विकला जात आहे सर्रास पणे गुटखा

By Sarkarmzanews

December 11, 2024 1:15 pm

Ads

न्युज डेस्क : अकोला, दिनांक ११ : तंबाखू व गुटख्या व्यसनामुळे अनेकांच्या आरोग्यावर परिणाम आजपर्यंत झाले आहे , गुटखा खानार्याचे तोंड उघडत नाही, तर अनेकांना जेवणहि सुद्धा करता येत नाही, या गुटख्याचे आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतात.

कर्क रोग होण्याची शक्यता या व्यसनामुळे नाकारता येत नाही, या सगळ्यानचा विचार करून राज्यात २० जुलै २०१२ रोजी गुटखा बंदीचा निर्णय झाला होता त्याला आजपर्यंत १२ वर्षे पूर्ण झाली.

पण जिल्ह्यात त्याची कडक अंमलबजावणी आजपर्यंत कदी झाली, आज पर्यंत कदी गुटखा जिल्ह्यात विक्री थांबलीच नाही.

आज सुद्धा अकोला जिल्ह्यात शहर व ग्रामीण भागातील पानटपरी वर दुकानान वर गुटखा खुले आम विकला जात आहे. एवढेच नव्हे तर जिल्ह्यात शाळा आणि महाविद्यालया जवळ हा गुटखा सहज पणे विध्यार्थी वर्गाला उपलब्ध होत आहे.

त्यामुळे युवा पिढी या व्यसनाला खूप मोठ्या प्रमाणावर बळी पडताना दिसत आहे, शासकीय कार्यालय, शाळा महाविद्यालयान, मध्ये तंबाखू मुक्त मोहीम, हे शासनाचे धोरण आहे.

वेळो वेळी याची जनजागृती सुद्धा करण्यात येते. पण हे फक्त दाखवण्यापुरती का? या मुळे अश्या प्रश्ननाची सुई नेहमी प्रशासना कळे फिरते.

विक्री होत असलेल्या गुटख्यावर, वर अन्न व औषध प्रशासनाचा मानकांना प्रमाणे कोणत्याही प्रकारची उत्पादन व समाप्तीची तारीख व कंपनीचा पत्ता , तसेच जास्तीत जास्त विक्री किंमत याचा पाकीटा वर नसते.

हा व्यवसाय अवैध असताना या गुटख्याची विक्री चिल्लर व ठोक व्यापार्यांनी जास्त प्रमाणात करावी, या साठी विक्रेत्यांना कंपनी कडून वेगवेगळ्या स्कीम मधून, लाखो रुपयाचे बक्षिश सुद्धा कंपनी, दिले जातात. या मध्ये एकपाकीट १० ते १०० रुपया पर्यंत स्क्र्याच कार्ड, रेनकोट,छत्र्या,स्वेटर

६०० पाकिटवर सहा खुर्च्या
९०० पाकिटवर मोबाइल
१५०० पाकिटवर सायकल
३३०० पाकिटवर वाशिंग मशीन
४५०० पाकिटवर फ्रीज
६००० पाकिटवर २२ इंची एलईडी टीव्ही
७५०० पाकिटवर ३२ इंची एलईडी टीव्ही
१५,००० पाकिटवर एसी
२५,००० पाकिटवर मोटारसायकल
३६,००० पाकिटवर मोपेड मोटारसायकल
९०,००० पाकिटवर बुलेट

अश्या अनेक स्कीम गुटखा कंपनी राबवीत असते.

महत्वाची बाब अशी कि गुटखा अन्न व सुरक्षा कायदा २००६ कलम ३ चा आधारे विक्री, साठवणूक व वाहतूक या अनुसार हा गुन्हा अजामीन पात्र आहे, या मधून व्यावसायिकाची सुटका होणे अशक्य आहे.,

तरी सर्व कानून कायदे धाब्यावर ठेवत हे व्यावसायिक निर्भीडपणे आपले व्यवसाय जोरात चालवतात.

अकोला जिल्ह्यात होत आहे खुल्या पद्धतीने गुटख्याची विक्री याचे कारण काय ?

अकोला जिल्ह्या हा मध्यप्रदेश चा सीमेला लगत असल्यामुळे गुटखा जिल्ह्यात आयात होणायास सोपा जातो, आंतरराज्यीय सीमेवर पोलिसांचे नाके असल्यावर सुद्धा हा गुटखा येतोच कसा, याचे उत्तर अधिकारी ठाम पणे देऊ शकत नाही. तसेच अकोला शहर व बोरगाव मंजू मुर्तिज़पूर, बर्शिटाकली हे मोठे शहर या व्यवसायाचे केंद्र स्थान बनले आहे. अकोला शहरातून काही गुटखा माफियांन कळून संपूर्ण जिल्ह्यात या व्यवसायाचे धागे दोरे जुळले आहे.

तसेच अकोला जिल्ह्यात एका पान टपरी वरून या व्यवसायचे धागे दोरे जुडले असल्याचे समजते.

जिल्ह्यात अनेको प्रकारचे गुटखा ब्रांड चालतात या साठी वेगवेगळे गुटखा ब्रेंडचे वेगळ वेगळे डीलर संपूर्ण जिल्ह्याला गुटखा पुरवण्याचे काम ते काम करीत आहे.

अकोला जिल्ह्यात का बर संपूर्ण पणे गुटखा बंदी होऊ शकत नाही?

या साठी जबाबदार म्हणजे अन्न व औषध प्रशासन व पोलीस प्रशासन

वेळोवेळी छोट्या पानटपरी वर कारवाई करून प्रसार माध्यमातून हे प्रशासन आपली वा वाही लुटताना दिसतात

आणि फक्त कागदोपत्री कारवाया, अन्न व औषध प्रशासन व पोलीस प्रशासन यांचा संगनमताने या व्यवसायाला चालना मिळते.

व्यवसायीकान कळून दिवाळी नसताना पण लक्ष्मि दर्शन मोठ्या प्रमाणात घडविले जाते व अधिकारी वर्गाला लाखों रुपयाची भेट दिली जाते?

गुटखा कंपनी कळून मिळालेली स्कीम मधले बक्षीक्षे सुद्धा या अधिकार्यांना गुटखा माफियान कडून दिले जाते. अशी चर्चा जनते मध्ये नेहमी सुरु असते.

अकोला जिल्हा भविष्यात खरच गुटखा मुक्त होऊ शकेल का ? हे पाहणे गरजेचे आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!