Join WhatsApp group

Ads

अकोला जिल्ह्याची “जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा)” बैठक संपन्न

By Sarkarmzanews

May 30, 2025 10:16 am

Ads

दिनांक २९ : अकोला जिल्ह्याची “जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा)” बैठक २८ मे २४ रोजी जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यलय अकोला येथे मा.खासदार श्री.अनुप संजयजी धोत्रे यांच्या अध्यक्षतेत आयोजित करण्यात आली होती.

यावेळी विकासात्मक कामे लवकर पूर्ण करून नागरिकांना प्रत्येक योजनेचा तत्काळ लाभ मिळवून द्यावा असे निर्देश देण्यात आले.

तसेच प्रधानमंत्री पिक विमा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मध्यान्ह पोषण आहार योजना, राष्ट्रीय ग्रामीण पाणीपुरवठा योजना, अमृत योजना, रोजगार हमी, दीनदयाल विद्युतीकरण योजना, मूलभूत सुविधा प्रकल्प, डिजिटल इंडिया योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, स्वच्छ भारत योजना, उज्वल अशुरंस योजना, सर्वशिक्षा योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन, राष्ट्रीय भूमी अभिलेख यासारख्या विविध केंद्र सरकार पुरुस्कृत योजनांसह दूरसंचार, महामार्ग, रेल्वे, खनिकर्म यासारख्या विविध महत्वपूर्ण विषयांवर चर्चा होऊन जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला.

यावेळी आमदार हरीश पिंपळे सह खासदार श्री.अनुप संजयजी धोत्रे, आमदार श्री.प्रकाशभाऊ भारसाकळे, जिल्हाधिकारी श्री.अजित कुंभार, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रभारी) श्री.मनोज जाधव, एसपी श्री.अर्चित चांडक, मनपा आयुक्त श्री.अजय लहाने व सर्व विभागाचे संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!