Join WhatsApp group

Ads

20 वर्षा नंतर भेटले सर्व दहावी चे विद्यार्थीचे गेट टु गेदर जल्लोषात पडले पार.

By Sarkarmzanews

January 29, 2025 8:21 pm

Ads

दिनांक २९ : मुर्तीजापुर : श्री वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय हातगाव,येथे 2004 /2005 या वर्षात शिकणारे सर्व विद्यार्थी यांची पुन्हा प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन ज्या विद्यालयात शिकत होते,त्याच विद्यालयात पुन्हा शाळा भरली,जुने विद्यार्थी मित्र मैत्रीन पाहुन सर्वांना खूप आनंद झाला.

कोणी उच्च पदावर कोणी ,देशसेवा करण्यासाठी सिमेवर आर्मी मध्ये,कोणी आरोग्य विभाग,कोणी ग्रामसेवक,तर कोणी पोलीस,होमगार्ड मध्ये तर कोणी,शेतकरी कोणी सामाजिक कार्यकर्ते, व समाजाच्या प्रत्येक ठिकाणी आपले कोणी तरी आहे, याचे सर्वांनाच व शिक्षकांना कौतुक वाटत होते.

या वेळी प्राचार्य पी एन ठाकरे सर,रामदास ठाकरेसर,श्रीकृष्ण बोळे सर,ईसर सर ,लीलाधर पवार सर,कथलकर सर,गुल्हाने सर,वानखडे मॅडम,राठोड मॅडम,बोंतेसर ,जावकेसर,जावके मॅडम ,डांगेसर आमत्रींत केले होते, सर्वांनी आपआपले अनुभव व जुन्या त्या आठवणी ताज्या केल्या, सर्व कार्यक्रम संपन्न झाल्यावर सर्वांना व्यवस्था होती.

या कार्यक्रमासाठी अमोल साव मयूर इंगळे मिलींद शिरसाठ,अतुल घेटे,गोपाल घोरमोडे,पंकज सिरसाम,प्रविण बोडे चरणदास वानखडे सागर सुधाकर इंगळे सागर वाकोडे बबन बर्डे कुणाल ठाकरे प्रदीप विलास तेलगोटे वैभव तायडे बर्डे गोपाल वाघमारे शरद वाघमारे चंद्रशेखर भोयर ज्ञानेश्वर वाकोडे शितल कोर किरण गोपकर शेरे प्रीती इंगोले कविता तायडे अंजली कथलकर रूपाली साखरपाडे सपना रामटेके सुषमा पोळकट मीनाक्षी बुरघाटे सुनंदा सुळे ,पुनम भोजे,श्रध्दा सातिंगे, राहुल बुदे या माजी विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेवून कार्यक्रम सफल केला.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!