Join WhatsApp group

Ads

अवैध विटभट्ट्यान वर तहसीलदार यांची कारवाई – सरकार माझा न्यूज impact

By Sarkarmzanews

December 20, 2024 6:08 pm

Ads

बार्शीटाकळी – दिनांक २० – अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तहसील अंतर्गत येत असलेला महान येथे महान गावचे आराध्य दैवत श्री करुनेश्वर महाराज संस्थान कडे जाणाऱ्या रस्त्याला लागून असलेली ई क्लास जमिनीवर वीट भट्ट्या तयार करणे करिता बेकायदेशीर पणे अतिक्रमण करण्यात येत आहे. विट भट्टी व्यापाऱ्याला स्वतचा जमिनी वर परवानगी देण्यात आली होती तरी स्वतचा जमिनीवर शेती करून शासनाचा ई क्लास जमिनीवर विट भट्टी टाकण्याची तयारीत सध्या हा व्यापारी दिसत आहे. तरी असून याकडे बार्शीटाकळी चे तहसीलदार यांनी लक्ष द्यावे, तसेच महान येथे चालू असलेल्या अवैध वीट भट्टयांची चौकशी करावी, अशी गावकर्यांची मागणी होती.

हि बातमी सरकार माझा न्यूज ने १९ डिसेंबर रोजी प्रसारित करताच त्वरित तसेच बार्शीटाकळी तहसीलदार राजेश वजीरे यांनी २० डिसेंबर रोजी अवैध विट भट्ट्यान वर दंडात्मक कारवाई सुरु केली असून शासनाचा ई क्लास जमिनीवर विटभट्ट्या सुरु आहे त्यांना ताबडतोब २ दिवसात विटभट्ट्या खाली करण्याचे आदेश दिले.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!