Join WhatsApp group

Ads

गोयनका नगरात शुक्ला इंजिनियरिंग वर्क वर कारवाई बाल कामगारास कामावर ठेवणाऱ्या विरूध्द गुन्हा दाखल

By Sarkarmzanews

January 11, 2025 5:20 pm

Ads

दिनांक ११ : मूर्तिजापूर : शासनाच्या आदेशनुसार कोणीही बाल कामगार यास कामावर ठेऊ नये, असे आदेश असताना स्थानिक गोयंकानगर येथे एका वर्क शॉप चालकाने आपल्या कारखान्यात १६ वर्षीय बाल कामगार ठेवून त्याच्या जवळून काम करून घेत असताना दुकान निरीक्षक यानी आज १२.३० वाजे दरम्यान धाड टाकली असता, दुकान चालक विरुध्द बालकामगार संरक्षण कायदा अंतर्गत सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

प्राप्त माहितीनुत्तार सुरेंद्र गजनान लोखंडे (४४) दुकान निरीक्षक श्रेणी २ तालुका मूर्तिजापूर, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय अंतर्गत अकोला यानी दिलेल्या फिर्यादीनुसार सहाय्यक कामगार आयुक्त अकोला यांच्या आदेशप्रमाणे मूर्तिजापूर येथे आज रोजी धाड सत्र ठाकले असता.

स्थानिक शुक्ला इंजिनियरिंग वर्क येथे गेले असता सदर कारखान्यात आयफाज खान (१६) राहणार सोनोरी हा गाड्या धुताना आढळत्याने दिनेश गोपाल शुक्ला (६०) रा. मूर्तिजापूर यांच्याविरुध्द सिटी पोलिस ठाण्यात कलम ७९ बालन्याय मुलाची काळजी व संरक्षण कायदा २०१५ सह कलम १४६ बीएनएस नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय गजानन थाटे करीत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!