Join WhatsApp group

Ads

-

प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रेत्यान वर कारवाई

By Sarkarmzanews

January 13, 2025 7:48 am

Ads

दिनांक : १३ : संक्रांत सणाच्या निमित्ताने अकोला जिल्हयातील चायना व नायलॉन मांजाची विक्री करणा-यांवर कठोर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील अधिकारी व अमंलदार यांची विविध पथके गठीत करण्यात आली होती. अकोला शहरातील मानवी व पशुपक्षांसाठी घटक असलेल्या चायना मांजाची साठवणूक करून विक्री करणाऱ्या व्यक्तींची माहीती घेवुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका आरोपीला अटक करून मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई केली आहे.

पोलीस स्टेशन डाबकी रोड हददीतील खैर मोहम्मद प्लॉट, येथील आरोपी मोहम्मद अय्याज शेख हसन,वय ६० वर्ष, याचे राहते घरी शासनाने प्रतिबंध घातलेला चायना मांजा (नायलॉन दोरा) ज्यामुळे मानवी जिवित्वास तसेच पक्षांचे जिवीतास धोका निर्माण होवू शकतो असा चायना मांजा जवळ बाळगुन विक्री करीत असताना मिळुन आल्याने त्याचे जवळुन १) Mono ktc fighter चायना मेड मांजाचे ४२ पिलांडु (बंडल), २) Mono ktc चायना मेड मांजाचे १० पिलांडु (बंडल)., ३) ALL out चायना मेड मांजाचे ११ पिलांडु (बंडल) असे एकुण ६३ पिलांडु (बंडल) प्रत्येकी ५०० रूपये प्रमाणे एकुण ३१,५०० रूपयांचा मुद्देमाल आढळुन आल्याने जप्ती कारवाई करून आरोपी व मुददेमाल पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशन डाबकी रोड यांचे ताब्यात देण्यात आला आहे.सदरची कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. शंकर शेळके, एपीआय विजय चव्हाण,पोहवा. फिरोज खान,उमेश पराये,खुशाल नेमाडे,पो. कॉ अभीषेक पाठक,आकाश मानकर,धिरज वानखडे,मो.आमीर, मपोका.स्वप्ना चौधरी, चालक.पो.कॉ.मनीष ठाकरे यांनी केली.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!