Join WhatsApp group

Ads

२० वर्षीय तरुणीवर रिक्षा चालकाचा अत्याचार, स्टेशनबाहेरच भयंकर अवस्थेत सापडली

By Sarkarmzanews

January 24, 2025 10:57 am

Ads

दिनांक २४ : मुंबई : मुंबईत एक धक्कादायक घटना घडल आहे. येथील राममंदिर स्थानकाजवळ एक २० वर्षीय तरुणी बेशुद्धावस्थेत आढळून आली आहे. या तरुणीवर क्रूरपणे लैंगिक अत्याचार करण्यात आला आणि त्यानंतर तिच्यावर सिझेरियन ब्लेड, तसेच दगडांसह अज्ञात वस्तूने हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

पीडितेवर अज्ञात रिक्षाचालकाने हल्ला केल्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसांनी हल्लेखोराचा शोध सुरू केला असून या भीषण गुन्ह्याची नोंद करुन तपास सुरू आहे. गोरेगाव पूर्व येथील वनराई पोलीस स्टेशन परिसारत ही घटना घडल्याची माहिती आहे.

मुंबईतील राम मंदिर रेल्वे स्थानक परिसरात एक २० वर्षीय तरुणी बेशुद्धावस्थेत आढळून आली. तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. तसेच, तिच्यावर सिझेरियन ब्लेडने हल्लाही करण्यात आला. इतकंच नाही तर या तरुणीच्या गुप्तांगात दगडाचे काही तुकडेही आढळून आले आहेत.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!