Join WhatsApp group

Ads

पत्रकार दिनानिमित्त मुर्तीजापुरात विविध कार्यक्रमांचे आयोजन : पत्रकारितेच्या मूल्यांचा जागर

By Sarkarmzanews

January 7, 2026 8:32 pm

Ads

मुर्तीजापुर : दिनांक ०७ : लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.निर्भीड,निष्पक्ष पत्रकारितेमुळे समाजातील अपप्रवृत्तींवर वचक निर्माण होतो.तसेच सर्वसामान्य जनतेचे विविध प्रश्न, अडचणी,अन्याय, अत्याचार,भ्रष्टाचार याबाबत आवाज उठवून न्याय मिळवून देण्याचे कार्य पत्रकारांच्या वतीने केल्या जाते.

पत्रकारांनी पत्रकारीतेचे कार्य पार पाडत असताना आपल्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी असे प्रतिपादन येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. विक्रम शर्मा यांनी केले.

येथील भक्तीधाम मंदिर सभागृहात पत्रकार दिनाचे औचित्य साधून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यासाठी आयोजित सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून विचार व्यक्त करताना ते बोलत होते.


यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार विलास मुलमुले,ॲड.क्षितिज त्रिपाठी,ग्रामीण पत्रकार संघाचे राज्याचे उपाध्यक्ष पी.एन.बोळे,ज्येष्ठ पत्रकार प्रा. अविनाश बेलाडकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.महाराष्ट्रात ६ जानेवारी हा दिवस मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीदिन पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

दिप प्रज्वलन करून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले.पाहुण्यांचा परिचय जयप्रकाश रावत यांनी करून दिला. प्रास्ताविकातून अनेक महत्त्वाचे मुद्दे आणि पत्रकारिता करताना पत्रकारांनी घ्यावयाची भूमिका यासंदर्भात प्रा. बेलाडकर यांनी विचार मांडले.

पत्रकार दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील ग्राम राजुरा सरोदे येथील कुमारी मैथिली राजू सरोदे हिची २६ जानेवारी रोजी राज्यस्तरीय शासकीय परेड करिता निवड झाल्याने तिचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी सर्व मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तालुक्यातील ग्राम धोत्रा(शिंदे)येथील पत्रकार मुजफ्फरखान यांचे नुकतेच निधन झाले असून त्यांना याप्रसंगी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सूत्रसंचालन विलास नसले यांनी केले. आभार अतुल नवघरे यांनी व्यक्त केले.

याच दिवशी हॉटेल व्यास येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास तालुक्यातील पत्रकार बांधवांसह भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पत्रकारांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात बोलताना आमदार हरीश पिंपळे यांनी सांगितले की, “पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजातील चांगल्या-वाईट गोष्टी निर्भीडपणे मांडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकार करतात. लोकशाहीचा आदर राखत मी किंवा कोणताही लोकसेवक कुठे चुकत असेल, तर पत्रकारांनी निःसंकोचपणे ती चूक जनतेसमोर आणावी. मात्र, त्याचवेळी पत्रकारितेतील नैतिकता, सत्यता आणि जबाबदारी जपली गेली पाहिजे.”

यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष हर्षल साबळे यांनीही पत्रकारांना शुभेच्छा देत समाजहितासाठी पत्रकारितेचे कार्य अधिक प्रभावी व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. जेष्ठ पत्रकार अविनाश बेलाडकर यांनी पत्रकारितेतील नैतिक मूल्ये, सत्याची पडताळणी आणि नवमाध्यमांचा जबाबदार वापर यावर मार्गदर्शन केले.

पत्रकार दिनाच्या सोहळ्याला सर्वस्वी ज्येष्ठ पत्रकार अनिल अग्रवाल, दीपक अग्रवाल,प्रा.दीपक जोशी,जयप्रकाश रावत, संतोष माने, संजय उमक,गौरव अग्रवाल,ॲड.निलेश सुखसोहळे,अतुल नवघरे,शेख मोईज,धनराज सपकाळ,संभाजी देशमुख,अथरखान,प्रा.एल.डी. सरोदे,बबलू यादव,गजानन गवई,नरेंद्र खवले,विशाल नाईक,अंकुश अग्रवाल,

प्रतीक कु-हेकर‌‌,अनिल भेंडकर,उद्धव कोकणे,शफीखान पठाण,मिलिंद जामनिक,रोहित सोळंके,आकाश जामनिक,प्रकाश श्रीवास,अजय प्रभे,रवी शिंदे,प्रविण ढगे,दिलीप तिहीले,श्याम वाळस्कर,सुमित सोनोने,मुमताजखान, नरेंद्र वाढोणकर,दिलीप तिहिले,संजय भड़के,राम महानकर,दिनेश श्रीवास,नागोराव तायडे, सुमित सोनवणे, प्रेमराज शर्मा,विलास सावळे,श्याम काकडे,सुनील वानखडे, योगेश आगाशे,नितीन टाले,आदित्य महाजन, विलास वानखडे,स्वप्निल जामनिक, सुनील अग्रवाल, सचिन बोणगिरे यांची उपस्थिती होती.‌

या दोन्ही कार्यक्रमांमधून पत्रकारितेच्या मूल्यांचा जागर करण्यात आला असून पत्रकार बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!