Join WhatsApp group

Ads

राजकीय विश्लेषण – अंतर्गत खेळींचे राजकारण किती काळ टिकते? – प्रभाग ८ चे उत्तर

By Sarkarmzanews

December 25, 2025 1:56 pm

Ads

मुर्तीजापुर : दिनांक २५ : १९७८ साली कृष्णकुमार जमादार यांच्या काळात महादेवआप्पा पिंपळे नगरसेवक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर ४७ वर्षा नंतर पिंपळे कुटुंबातील कोणतीही व्यक्ती नगरसेवकपदी निवडून आली नव्हती.

आज भूपेंद्र मारोतीअप्पा पिंपळे हे प्रभाग क्रमांक ८ मधून नगरसेवक म्हणून निवडून येत पिंपळे कुटुंबाचा तुटलेला राजकीय दुवा पुन्हा एकदा जोडला गेला आहे.

प्रभाग क्रमांक ८ मधील निवडणूक ही केवळ दोन उमेदवारांमधील लढत नव्हती, तर ती पक्षांतर्गत गटबाजी, घरातील राजकीय संबंध आणि मानसिक दबावाच्या राजकारणाचा एक मोठा प्रयोग होती. या निवडणुकीत अंतर्गत गटबाजी कशी आखली गेली आणि ती कशी अपयशी ठरली, याचे विश्लेषण सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे.


विरोधी राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, विरोधकांसोबतच भाजपमधील काही वरिष्ठ नेत्यांनी मिळून एक सूक्ष्म पण धोकादायक रणनीती आखली. या रणनीतीचा पहिला टप्पा म्हणजे अमोल पिंपळे यांना उमेदवारी न मिळू देणे आणि भूपेंद्र पिंपळे यांनाच उमेदवारी मिळेल, अशी परिस्थिती निर्माण करणे. वरवर पाहता हा निर्णय पक्षशिस्तीचा वाटत असला, तरी आतून त्यामागे वेगळेच राजकारण सुरू होते.


भूपेंद्र पिंपळे हे आमदार हरीश पिंपळे यांचे सख्खे भाऊ असल्याने, त्यांची उमेदवारी म्हणजे घरातच राजकीय कलह निर्माण होईल, असा हिशेब या गटाने बांधला होता. “घरात उमेदवारी दिली, तर मतभेद उफाळतील, कार्यकर्ते संभ्रमात पडतील आणि आमदार मानसिकदृष्ट्या दबावाखाली जातील,” हा या अंतर्गत गटबाजीचा मुख्य हेतू होता.


उमेदवारी घोषित होताच पुढचा टप्पा राबवण्यात आला. अमोल पिंपळे यांना भूपेंद्र पिंपळे यांच्या विरोधात उभे राहण्यासाठी धनशक्ती, बाह्य राजकीय पाठबळ आणि विरोधकांची मदत उपलब्ध करून देत एक जाणीवपूर्वक राजकीय प्रयोग उभा करण्यात आला. यात काही भाजप वरिष्ठ नेत्यांनी विरोधकांशी हातमिळवणी करून घरातील मतभेद थेट रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा उघडपणे सुरू झाली.


या अंतर्गत गटबाजीचा उद्देश एकच होता—आमदार हरीश पिंपळे यांचे मानसिक खच्चीकरण करणे. उमेदवार जिंकतो की हरतो, यापेक्षा नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे करणे, संघटन विस्कळीत करणे आणि भविष्यातील राजकीय वाटचाल अडथळ्यात आणणे, हा या खेळीचा खरा हेतू होता.


मात्र, हा संपूर्ण प्रयोग अपेक्षेप्रमाणे फसला. कारण, अंतर्गत गटबाजी ही कागदावर जरी प्रभावी वाटत असली, तरी प्रत्यक्षात ती जनतेसमोर उघडी पडते. घरातील भांडण राजकीय फायद्यासाठी वापरण्याचा प्रयत्न मतदारांना पटला नाही. उलट, अशा खेळींमुळे सहानुभूतीचा प्रवाह वेगळ्याच दिशेने वळल्याचे चित्र दिसून आले.


या निवडणुकीतून एक महत्त्वाचा धडा समोर आला आहे—अंतर्गत गटबाजी, कटकारस्थान आणि मानसिक दबावाचे राजकारण अल्पकाळ परिणामकारक वाटू शकते, पण दीर्घकाळात तेच शस्त्र स्वतःवर उलटते. प्रभाग क्रमांक ८ मधील निवडणूक ही त्याची जिवंत उदाहरण ठरली आहे.


आज या निकालानंतर पक्षांतर्गत राजकारणात आत्मपरीक्षणाची गरज असल्याची चर्चा सुरू झाली असून, “घरातील राजकारण रस्त्यावर आणणे” ही रणनीती किती धोकादायक ठरू शकते, हे या निवडणुकीने स्पष्टपणे दाखवून दिले आहे.

आता या राजकीय संधीचा व निवडून आलेले नगरसेवक पदाचा भूपेंद्र पिंपळे भविष्यात या संधीचा सोना कसा करणार? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!