Join WhatsApp group

Ads

स्वप्नांना आकार देणारी जिद्द; लक्ष्मी चक्रनारायण PSI पदावर विराजमान

By Sarkarmzanews

December 24, 2025 11:55 pm

Ads

मुर्तिजापूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी कामगिरी करत जामठी बु. येथील लक्ष्मी वेणुताई मच्छिंद्र चक्रनारायण यांनी पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदापर्यंत मजल मारली आहे. नुकत्याच महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथे पार पडलेल्या दीक्षांत संचलन सोहळ्यात त्या अधिकृतपणे पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवेत रुजू झाल्या.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या २०२१ च्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत यश संपादन केल्यानंतर लक्ष्मी चक्रनारायण यांनी तब्बल एक वर्षाचे खडतर व शिस्तबद्ध प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले.

प्रशिक्षणानंतर झालेल्या PSI सत्र क्रमांक १२६ च्या अंतिम परीक्षेत त्यांनी राज्यात ७वा क्रमांक मिळवून आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवला.

आपल्या यशाविषयी बोलताना PSI लक्ष्मी चक्रनारायण म्हणाल्या की,“हे यश सततचा प्रयत्न, कठोर मेहनत आणि माझ्यावर विश्वास ठेवून पाठबळ देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आहे.”

ग्रामीण भागातून येऊन, अनेक अडचणींवर मात करत त्यांनी मिळवलेले हे यश आज अनेक तरुणींसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.

“परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, शिस्त आणि आत्मविश्वास असला की स्वप्नपूर्ती नक्कीच होते,” असा संदेश PSI लक्ष्मी यांच्या यशातून मिळतो.

मुर्तिजापूर तालुक्यातून घडलेली ही कामगिरी निश्चितच युवा पिढीला, विशेषतः तरुणींना स्वप्न पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची नवी ऊर्जा देणारी आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!