Join WhatsApp group

Ads

-

अपघाताची वाट पाहतोय का PWD

By Sarkarmzanews

December 20, 2025 3:37 pm

Ads

मुर्तिजापूर : २० : मुर्तिजापूर तालुक्यातील ग्राम सांगावा मेळ (जि. अकोला) येथील लाखपुरी ते म्हैसांग रोडचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वारंवार तक्रारी करून सुद्धा यावर आता कोणती कारवाई झाली नाही.

रस्ता पूर्ण होऊन काही दिवसही होत नाहीत, तोच रस्त्याच्या मधोमध मोठी दरार पडली असून अपघातांचा धोका प्रचंड वाढला आहे.

दरार इतकी खोल व धोकादायक आहे की, कधीही मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मात्र या गंभीर प्रकाराकडे बांधकाम विभाग (PWD) अकोला जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

👉 कमिशनखोरीचा संशय

ग्रामस्थांच्या मते, बांधकाम विभाग अकोला व ठेकेदार यांच्या संगनमतातून कमिशनखोरीमुळेच हा रस्ता निकृष्ट दर्जाचा तयार करण्यात आला. करदात्यांचा पैसा वाया घालवण्यात आला असून, रस्त्याचे सत्य काही दिवसांतच समोर आले आहे.

👉 अपघात झाला तर जबाबदारी कोणाची?

“या रस्त्यावर जर कोणाचा जीव गेला तर त्याची जबाबदारी बांधकाम विभाग अकोला घेणार का?” असा थेट सवाल संतप्त नागरिक उपस्थित करत आहेत. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही तात्काळ कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.

👉 गावकऱ्यांची प्रसारमाध्यमांकडे धाव

या गंभीर बाबीची माहिती प्रदीप पाटील गावंडे, अवधूत शिरसाट, नंदू मोठे, गोपाल तिवारी, सागर सोळंके, दिगंबर गावंडे, आकाश सोळंके, सिकंदर शिरसाट व समस्त गावकरी मंडळींनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

ग्रामस्थांच्या मागण्या

रस्त्याची तात्काळ तांत्रिक चौकशी करावी.

दोषी ठेकेदारावर कडक कारवाई व ब्लॅकलिस्ट करावी.

निकृष्ट कामास जबाबदार असलेल्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी.

रस्ता त्वरित दुरुस्त करून सुरक्षित करावा.

बांधकाम विभाग अकोला अपघात होण्याची वाट पाहतोय का?

हा प्रश्न आज संपूर्ण गावकरी मंडळीत व तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

Related Article

जनावरचोरांचा धुमाकूळ! पशुपालकांचा सवाल – पोलिसांना चोर सापडत नाहीत की शोधले जात नाहीत?

मुर्तीजापूर तालुक्यासाठी आमदार यांचे दिलासादायक निर्णय; आधुनिक आरोग्य सेवांचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर

मुर्तीजापूरात धान्य घोटाळ्याचा भूकंप ? तपास यंत्रणांच्या हालचालींनी वाढली उत्सुकता : रेशन व्यवस्थेतील काळे धंदे उघड होणार?

“ठाणेदार गेले बदलीवर… पण मुर्तिजापूरकरांच्या मनातून जाणार नाहीत अजित जाधव!”

बोरगाव मंजूचे ‘रतन खत्री’ कोण ? स्मारक परिसरातील अवैध धंद्यांमुळे चर्चांना उधाण

माना पोलिसांची गावठी हातभट्टी अड्ड्यावर धाड; ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी ताब्यात

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!