Join WhatsApp group

Ads

एमआयडीसी पोलीस स्टेशनची गुटखा विरोधी मोहीम—एक आरोपी अटक

By Sarkarmzanews

December 12, 2025 12:15 pm

Ads

अकोला : दिनांक १२: दि. ११ डिसेंबर २०२५ रोजी मा. पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या डी.बी. पथकाने मोठी कारवाई करत शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला रंगेहाथ पकडले आहे.

डी.बी. पथकाला मिळालेल्या खबरीनुसार अकोला येथून शिवणीकडे लाल रंगाच्या पॅशन प्रो मोटारसायकल (क्र. MH 30 AW 949) वरून प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर नॅशनल हायवेवरील पीकेव्ही मुख्य गेटसमोर नाकाबंदी करण्यात आली.नाकाबंदी दरम्यान समीर खान हसन खान (वय 30, रा. जुना बैदपुरा, अकोला) हा संशयित आढळून आला. त्याच्या मोटारसायकलची तपासणी केली असता, प्रतिबंधित गुटखा/तंबाखूचा साठा आढळून आला:

वाह पान मसाला – 100 पाकिटे (किंमत ₹12,000)

W च्युइंग तंबाखू – 100 पाकिटे (किंमत ₹1,500)

हॉट प्रीमियम पान मसाला – 15 पाकिटे (किंमत ₹2,250)

H2 प्रीमियम च्युइंग टोबॅको – 19 पाकिटे (किंमत ₹1,425)

V1 च्युइंग टोबॅको – 12 पाकिटे (किंमत ₹360)

असा एकूण ₹17,535 किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला.

याशिवाय लाल-काळ्या रंगाची पॅशन प्रो मोटारसायकल (किंमत ₹40,000) जप्त करण्यात आली असून एकूण ₹57,535 किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुटखा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईत सहभागी अधिकारी:

मा. पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल जंजाळ, पीएसआय दयाराम राठोड, पोहेकॉ विजय अंभोरे (ब.क्र. 1463) व पोहेकॉ सुनिल टाकसाळे (ब.क्र. 1520) यांनी ही कारवाई केली.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!