Join WhatsApp group

Ads

पायटांगी जवळील भीषण तिहेरी अपघातात उपचारा दरम्यान आणखी एकाचा मृत्यू

By Sarkarmzanews

October 27, 2025 6:06 pm

Ads

दिनांक २७/ऑक्टो/२५ : (प्रतिनिधी : योगेश विजयकर)

मुर्तीजापूर तालुक्यातील पायटांगी जवळ दिनांक २३ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या तिहेरी अपघातात उपचारा दरम्यान आणखी एक मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातात ऑटो, ट्रॅक्टर आणि कार यांचा समावेश होता. दुर्घटनेत ऑटोचालक जागीच ठार झाला होता, तर सहा जण गंभीर जखमी झाले होते.

जखमींवर अकोला शहरातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू होते. यामध्ये ऑटोमधील प्रवासी राहुल वानखडे रा.लोणी (अमरावती) हे गंभीर जखमी होते. त्यांच्यावर ओझोन रुग्णालय, अकोला येथे उपचार सुरू असताना आज दुपारी सुमारे २ वाजता त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!