Join WhatsApp group

Ads

ज्ञान नर्मदा बहुउद्देशीय संस्थेचा पुढाकार — दिव्यांगांसोबत दिवाळी साजरीहॅपी वुमन्स क्लबने दिला मानवतेचा परिचय

By Sarkarmzanews

October 20, 2025 8:29 pm

Ads

मुर्तीजापूर (प्रतिनिधी)
ज्ञान नर्मदा बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक विष्णू लोडम यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या सामाजिक उपक्रमांच्या मालिकेत, हॅपी वुमन्स क्लबच्या अध्यक्षा सुनिता लोडम यांच्या पुढाकाराने यंदाही दिव्यांग बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली.

संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सिरसो गायरान येथील कुष्ठरोगी, दिव्यांग आणि गरजू बांधवांना दिवाळी फराळ, मिठाई, केक, तसेच फुलझडी–फटाके वाटप करून आनंदाचा सण साजरा करण्यात आला. या उपक्रमामुळे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद फुलला.

ज्ञान नर्मदा संस्था आणि हॅपी वुमन्स क्लब वर्षभर राजमाता जिजाऊ जयंती उत्सव, जागतिक महिला दिन, वृक्षारोपण, आरोग्य शिबिर, स्वच्छता अभियान, विद्यार्थी गुणगौरव, रक्तदान शिबिर, ज्येष्ठ नागरिक सत्कार, जागतिक पर्यावरण दिन, होतकरू महिलांचा गौरव अशा विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करत असतात.

या प्रसंगी विष्णू लोडम म्हणाले, “सण-उत्सवांमध्ये व्यर्थ खर्च न करता समाजोपयोगी कार्यातूनच खरे आत्मिक समाधान मिळते.” त्यांनी सर्व दिव्यांग बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाला सुनिता लोडम, रूपाली तिडके, डॉ. स्वाती पोटे, क्षमा इंगळे, दिपाली देशमुख, कविता साखरे, माया दवंडे, ममता मालानी, कल्पना तिडके, डॉ. अनुष्का तिडके, नंदिनी प्रेम शर्मा, कु. विभूती लोडम, अतुल गावंडे, प्रेम शर्मा, विलास सावळे, पंकज मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी दिपाली देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!