Join WhatsApp group

Ads

--

अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणाऱ्या 3 तरुणींवर गुन्हा दाखल; पोलिसांनी नेमके काय आरोप केले?

By Sarkarmzanews

August 19, 2025 7:30 am

Ads

पुणे : दिनांक १९ : पुण्यामध्ये पोलिसांनी जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्यानं त्यांच्यावर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा नोंद व्हावा, अशी मागणी करणाऱ्या मुलींवरच पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

पोलिसांवर गुन्हा नोंद व्हावा यासाठी 3 पीडित मुलींच्या बाजूने पुणे आयुक्तालय परिसरात ठिय्या मांडून बसणाऱ्या आंदोलक श्वेता पाटील आणि अ‍ॅड. परिक्रमा खोत यांच्यासहित एकूण 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरिक्षक रेश्मा मोरे यांनी ही तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, 8 जणांवर बेकायदा जमाव तयार करणे, सरकारी कामात अडथळे निर्माण करणे आणि सरकारी मालमत्तेचं नुकसान करणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दुसरीकडे 5 ऑगस्टला दाखल झालेल्या या गुन्ह्याबाबत आंदोलकांना काहीही कल्पना नसल्याचं त्यांनी सांगितलं. आता माध्यमांमधून याची माहिती मिळत असल्याचं त्यांनी नमूद केलं.

न्याय मागण्यासाठी गेलेल्या आंदोलकांवरच गुन्हा दाखल

जातिवाचक शिवीगाळ करणार्‍या पोलिसांवर तक्रार दाखल करण्यात यावी, या मागणीसाठी पीडित महिला आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पुणे पोलीस आयुक्तांच्या कार्यालयासमोर 3 ऑगस्टला रात्री उशिरापर्यंत ठिय्या आंदोलन केलं होतं.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!