Join WhatsApp group

Ads

वाहनातून गायींची तस्करी उधळली; पोलिसांची कारवाईत ६.३० लाखांचा माल जप्त

By Sarkarmzanews

July 22, 2025 3:53 pm

Ads

अकोला :(दि. २२ जुलै २५) गायींची बेकायदेशीर तस्करी करणाऱ्या टोळीवर रामदास पेठ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलीस निरीक्षक शिरीष खंदारे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली.

मच्छी मार्केटजवळ इमाम बडा जवळ सापळा रचत एक वाहन थांबवण्यात आले. तपासणी दरम्यान गाडीत दोन गायी आढळून आल्या.

पोलिसांनी सदर वाहन आणि गायींसह एकूण ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.वाहन क्रमांक MH 30 BD 3613 ही चारचाकी गाडी तस्करीसाठी वापरण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

यात अंदाजे ३० हजार रुपये किंमतीच्या दोन गायी आढळल्या असून, वाहनाची किंमत ६ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक शिरीष खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल भातखडे, रोशन पटले आणि अभिजीत इंगळे यांच्या पथकाने केली. अज्ञात आरोपीविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जप्त केलेल्या गायींना गोशाळेत सुरक्षित ठेवण्यात आले असून, त्यांची योग्य देखभाल केली जात आहे. अकोला जिल्ह्यात अशा प्रकारच्या तस्करीच्या घटना वाढीस लागल्याने पोलिसांकडून सातत्याने कारवाई करण्यात येत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!