Join WhatsApp group

Ads

-

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी जाहिरात, होर्डिंग, उत्सव नको!मुख्यमंत्री सहायता निधीत अधिकाधिक योगदान द्या

By Sarkarmzanews

July 18, 2025 1:46 am

Ads

मुंबई :१८ जुलै : मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस येत्या 22 जुलै रोजी आहे. या दिवशी कोणतेही बॅनर, होर्डिंग, वृत्तपत्र किंवा टेलिव्हिजन माध्यमांमधून जाहिराती देण्यात येऊ नयेत, असे स्पष्ट निर्देश भारतीय जनता पक्षातर्फे देण्यात आले आहेत.

भाजपाचे कार्यालय सचिव मुकुंद कुळकर्णी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, पक्षाच्या वतीने सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या सूचनेचे काटेकोर पालन करावे.

कोणत्याही प्रकारचे जाहिरातबाजी, बॅनर किंवा होर्डिंग लावल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशाराही पक्षाकडून देण्यात आला आहे.त्याऐवजी, इच्छुकांनी मुख्यमंत्री सहायता निधीत आर्थिक योगदान द्यावे, असे आवाहन भाजपातर्फे करण्यात आले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!