Join WhatsApp group

Ads

गाय चोरी प्रकरणात मूर्तिजापूर शहर पोलिसांनी केली दोघांना अटक

By Sarkarmzanews

July 15, 2025 11:25 am

Ads

मुर्तिजापूर (15 जुलै 25) – शहरातील बुब पेट्रोल पंपाच्या मागील परिसरातून गाय चोरी केल्याच्या प्रकरणात मुर्तिजापूर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

या प्रकरणी पोलीस स्टेशन मुर्तिजापूर शहर येथे गुन्हा क्र. 347/25 भादंवि कलम 303(2) BNS 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी गोविंद रामचंद्र अग्रवाल (वय 61, रा. अकोला अर्बन बँकेजवळ, मुर्तिजापूर) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 11 जुलै 2025 रोजी रात्री 2.30 वा. च्या सुमारास त्यांनी नेहमीप्रमाणे चारापाण्यासाठी गाय बाहेर सोडली होती. याच दरम्यान दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या लाल-पांढऱ्या रंगाची, अंदाजे दोन वर्षे वयाची, काळा शेपूट असलेली व अंदाजे ₹15,000 किमतीची गाय चोरून नेली.

यावरून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला असून, HC श्याम मडावी यांनी फिर्याद नोंदवली व तपासाची जबाबदारी HC सुरेश पांडे यांच्याकडे सोपविण्यात आली.

पोलिसांनी तपासादरम्यान आरोपी

1) मोहम्मद साकिब मोहम्मद आशक (वय 27), 2) नियजोद्दीन रियाशोद्दीन (वय 38) दोघेही रा. पठाणपुरा, जुनी वस्ती, मुर्तिजापूर यांना अटक केली आहे.

या घटनेने शहरात पुन्हा एकदा जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!