Join WhatsApp group

Ads

-

भाजप खोलेश्वर मंडळातर्फे गुरु पौर्णिमा उत्सव साजरा

By Sarkarmzanews

July 11, 2025 7:47 pm

Ads

अकोला | प्रतिनिधीभाजप खोलेश्वर मंडळाच्या वतीने अकोला महानगरात गुरु पौर्णिमेनिमित्त विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम प्रदेश सरचिटणीस व आमदार रणधीरभाऊ सावरकर, खासदार अनुपभाऊ धोत्रे, आमदार वसंतजी खंडेलवाल, महानगराध्यक्ष जयंतभाऊ मसने व माजी अध्यक्ष विजयभाऊ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात पार पडला.

श्री तपे हनुमान मंदिर परिसरात आयोजित या कार्यक्रमात आरतीचे आयोजन करण्यात आले. यानंतर पंडित श्री तिवारी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रातील सीताबाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिकची सर, राजनीतिक विभागातील जयंतभाऊ मसने व विजयभाऊ अग्रवाल यांचा यथोचित सन्मान करून त्यांचे मार्गदर्शन घेण्यात आले.

कार्यक्रमात विविध विभागांतील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. वैद्यकीय क्षेत्रात डॉ. अभयजी जैन, विधी क्षेत्रात सरकारी वकील ऍड. राजेश्वरजी देशपांडे, पोलिस विभागातील पोलीस निरीक्षक श्री संजयजी गवई, क्रीडा क्षेत्रात प्रशिक्षक सतीशचंद्र भट सर व कोचिंग क्लास क्षेत्रातील श्री शंकर शर्मा सर यांना गौरविण्यात आले.या वेळी संजय गोटफोडे, नितेश पाली, संतोष पांडे, प्रकाश घोगलिया, मनिष बाच्छुका, रुपेश चौरसिया, सुरेंद्र चव्हाण, नवीन जाधव, संतोष डोंगरे, मनोज साहू, राहुल चौरसिया, गणेश सपकाळ, विक्की ठाकूर, कृष्णा पांडे यांच्यासह भाजप महानगर व मंडळ पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Article

जनावरचोरांचा धुमाकूळ! पशुपालकांचा सवाल – पोलिसांना चोर सापडत नाहीत की शोधले जात नाहीत?

मुर्तीजापूर तालुक्यासाठी आमदार यांचे दिलासादायक निर्णय; आधुनिक आरोग्य सेवांचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर

मुर्तीजापूरात धान्य घोटाळ्याचा भूकंप ? तपास यंत्रणांच्या हालचालींनी वाढली उत्सुकता : रेशन व्यवस्थेतील काळे धंदे उघड होणार?

“ठाणेदार गेले बदलीवर… पण मुर्तिजापूरकरांच्या मनातून जाणार नाहीत अजित जाधव!”

बोरगाव मंजूचे ‘रतन खत्री’ कोण ? स्मारक परिसरातील अवैध धंद्यांमुळे चर्चांना उधाण

माना पोलिसांची गावठी हातभट्टी अड्ड्यावर धाड; ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी ताब्यात

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!