Join WhatsApp group

Ads

---

कृषी विभागाकडून भुंगे लागलेल्या बियाण्यांचे वाटप – शेतकऱ्यांची फसवणूक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आक्रोश

By Sarkarmzanews

July 5, 2025 10:44 pm

Ads

मुर्तिजापूर : ६ जुलै २५ : मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेली राज्य बियाणे महामंडळाची बियाणे पिशवी निकृष्ट दर्जाची असून, त्यामध्ये भुंगे आढळल्याचे उघड झाले आहे. या बियाण्यांमुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे पीक उगवलंच नाही किंवा उगवल्यावर मर गेलं. परिणामी, हजारो रुपयांचा फटका बसला आहे.

या प्रकाराविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन गावंडे यांनी महामंडळाच्या महाव्यवस्थापकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जून २०२५ मध्ये मूर्तिजापूर कृषी विभागाच्या माध्यमातून ही भुंगे लागलेली बियाणे वितरित झाली.

दुष्काळ, महागाई आणि नापिकीने आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सरकारी यंत्रणेकडूनच मिळालेली ही फसवणूक अधिक धक्कादायक ठरत आहे.

या गंभीर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई व नव्या दर्जेदार बियाण्यांची उपलब्धता करावी, अशी जोरदार मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!