Join WhatsApp group

Ads

बीके चौकवर जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा – ७ आरोपी ताब्यात

By Sarkarmzanews

July 3, 2025 11:10 pm

Ads

दिनांक ४ जुलै २५ : अकोला : शहरातील बीके चौक येथे जुगार खेळल्या जात असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सतीश कुलकर्णी यांना मिळाली. त्यानुसार विशेष पोलिस पथकाने धाड टाकून सात जुगार खेळणाऱ्यांना अटक केली असून त्यांच्याकडून ₹1 लाख 1 हजार 390 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सध्या जिल्ह्यात पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वाखाली “ऑपरेशन प्रहार” राबवले जात आहे. याच मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

बीके चौक हा एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. मिळालेल्या माहितीनुसार, सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने ही कारवाई केली. पकडलेल्या आरोपींवर महाराष्ट्र युवक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधिकारी साई रत्नदीप पलसापगर, अनिल खेडकर, विनय जाधव, रवि घीवे, शेख नदीम यांच्या सहकार्याने पार पडली.

शहरातील अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांची नजर असून, अशा अड्ड्यांवर सातत्याने कारवाई होणार असल्याचे संकेत या छाप्याने दिले आहेत.

Related Article

जनावरचोरांचा धुमाकूळ! पशुपालकांचा सवाल – पोलिसांना चोर सापडत नाहीत की शोधले जात नाहीत?

मुर्तीजापूर तालुक्यासाठी आमदार यांचे दिलासादायक निर्णय; आधुनिक आरोग्य सेवांचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर

मुर्तीजापूरात धान्य घोटाळ्याचा भूकंप ? तपास यंत्रणांच्या हालचालींनी वाढली उत्सुकता : रेशन व्यवस्थेतील काळे धंदे उघड होणार?

“ठाणेदार गेले बदलीवर… पण मुर्तिजापूरकरांच्या मनातून जाणार नाहीत अजित जाधव!”

बोरगाव मंजूचे ‘रतन खत्री’ कोण ? स्मारक परिसरातील अवैध धंद्यांमुळे चर्चांना उधाण

माना पोलिसांची गावठी हातभट्टी अड्ड्यावर धाड; ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी ताब्यात

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!