Join WhatsApp group

Ads

गोवंश मासाची विक्रीकरणाऱ्या दुकानांवर उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे पथकाची छापेमारी: 102 कि.लो. गोवंश मास जप्त

By Sarkarmzanews

June 5, 2025 1:43 am

Ads

६ जून २५ : शहरात गोवंशांच्या कत्तलींवर प्रतिबंध करण्याबाबत मा. पोलीस अधिक्षक अकोला यांचेद्वारे सुचना प्राप्त असून आज दिनांक 04/06/2025 रोजी श्री. सतिश कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग यांचे मार्गदर्शना खाली त्यांचे पथकाने प्राप्त गोपनिय माहीतीच्य आधारावर डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीतील खैर महोम्मद प्लॉट परिसरात दोन दुकानांवर रेड कारवाह्या करुन गोवंश मासाची विक्री करणाऱ्या आरोपी नामे (01) शेख इरफान शेख उस्मान कुरेशी, वय 53 वर्ष, आणि 02) शेख वसीम शेख करीम वय 28 वर्षे यांचे ताब्यातून अनुक्रमे 72 किलो आणि 30 किलो असा 102 किलो गोवंश मासाचा साठा आणि मास विक्रीचे साहीत्य असा एकून 22.200/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. गुन्हयातील जप्त गोवंश मासाची म.न.पा. कर्मचाऱ्यांच्या मदतीने विल्हेवाट लावण्यात आली असून गुन्हयातील आरोपीतांविरुध्द पोलीस स्टेशन डाबकी रोड येथे प्राणि संरक्षण अधिनियम अन्वये दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. अर्चित चांडक, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री अभय डॉगरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सतिश कुलकणों यांचे मार्गदर्शना खाली पो.उप.नि. रत्नदिप पळसपगार, पो.हे.कॉ. दिपक पाटील, रवि घिवे, विनय जाधव, पो.कॉ.राज चंदल, नदिम शेख आणि मयूर उमाळे यांनी पर पाडली आहे.

सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, गोवंशाची कत्तलोच्या उद्देशाने तस्करी आणि गोमांसाची खरेदी-विक्री करण्यास महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारीत) अधिनियम अन्वये बंदी असून कोणीही कायद्याचा भंग करुन उपरोक्त प्रतीचंधीत कृत्य करु नये, तसेच आपणास गोवंशसंबंधीत कोणत्याही अपराधाची माहीती प्राप्त असल्यास त्याबाबत आपले हद्दीतील पोलीस स्टेशन अथवा नियंत्रण कक्षाला अवगत करा.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!