Join WhatsApp group

Ads

खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात पोलीसांना ११ महिन्या नंतर यश – मुंबई येथून केली पोलीस पथकाने अटक

By Sarkarmzanews

June 3, 2025 12:21 pm

Ads

दिनांक ०३ जून २५ : मूर्तिजापूर :- गत वर्षी शहरातील गजानन महाराज मंदीरा मागे प्रतिक नगर येथे त्यांचे हॉटेल मध्ये काम करणारे मजुर राहत असलेल्या घरामध्ये एका अनओळखी मुलीची हत्या झाली होती.

तेव्हापासून गुन्ह्यातील संशयित असलेला आरोपी चेतन महादेव श्रृगांरे वय ३२ वर्षे रा ग्राम हरसुल तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ हा फरार होता. तो मुंबई येथे सांताक्रूझ भागात असल्याची गुप्त माहिती शहर पोलीसांना मिळताच तेथील स्थानिक पोलीसांचा मदतीने आरोपीला अटक करण्यात आली.


राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर असलेल्या वैशाली वाईन बारवर घटनेच्या सात आठ वर्षांपूर्वी चेतन उर्फ कृणाल उर्फ सनी महादेव शृंगारे (३२) रा. हरसूल ता. दिग्रस हा कामगार म्हणून काम करीत असताना काम सोडून गेला होता परत २१ जुलै रोजी सोबत एका २६वर्षीय युवतीला घेऊन तो पुन्हा काम करण्याकरिता आला. दोघेही सदर बारवर काम करीत होते. २३ जुलै रोजी कामावर न जाता घरीच होते.

इतर कामगार कामावर गेल्याने हे दोघेच घरात होते व सदर महिलेस नशेचे व्यसन असून ती टॅटू आर्टिस्टसुध्दा होती. चेतन सुध्दा ‘नशेखोर असल्याची माहिती आहे. कृणाल याने शांतीक्रिया प्रशांत कश्यप (२६) रा. आसाम हल्ली मुक्काम दिल्ली हिचा २३ जुलैच्या पहाटे ३ वाजतापुर्वी खून केला. त्यानंतर आरोपी पसार झाला होता.


गतवर्षी २४ जुलै रोजी हॉटेल वैशाली येथे काम करणाऱ्या चेतन महादेव श्रृंगारे याने मुळीच आसामची व टॅटू आर्टिस्ट असलेल्या शांतीक्रिया कश्यप हिचा खून करुन पसार झाला होता, शांतीक्रिया ही घटनेच्या काही दिवसांपूर्वीच शुभम महाजन यांच्या घरात चेतन सोबत राहत होती. मध्यरात्री दरम्यान शांतीक्रिया हिचा जड हत्याराने डोक्यात वार करुन खून केला, तेव्हा पासून मूर्तिजापूर शहर पोलीस आरोपीच्या शोधात होते, त्याचा विविध ठिकाणी शोध घेतला असता तो मिळून आला नाही व मागील सात वर्षांपासून तो त्याच्या मुळ गावी राहत नसल्याची माहिती पोलीसांना मिळाली. पोलीसांनी गुप्त व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन त्याला मुंबई येथून अटक केली.


सदरचा गुन्हा पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अजित जाधव, पोलीस उपनिरीक्षक गणेश सुर्यवंशी, पोलीस हवालदार सचिन दांदळे बनं १७४३, मंगेश विल्हेकर बनं १४६२, पोकॉ सतिश चाटे बनं २१३६, सायबर सेल अकोला यांनी
सदरचा गुन्हा उघड करण्यात यश मीळविले असुन पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश सुर्यवंशी करत आहे.

Related Article

जनावरचोरांचा धुमाकूळ! पशुपालकांचा सवाल – पोलिसांना चोर सापडत नाहीत की शोधले जात नाहीत?

मुर्तीजापूर तालुक्यासाठी आमदार यांचे दिलासादायक निर्णय; आधुनिक आरोग्य सेवांचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर

मुर्तीजापूरात धान्य घोटाळ्याचा भूकंप ? तपास यंत्रणांच्या हालचालींनी वाढली उत्सुकता : रेशन व्यवस्थेतील काळे धंदे उघड होणार?

“ठाणेदार गेले बदलीवर… पण मुर्तिजापूरकरांच्या मनातून जाणार नाहीत अजित जाधव!”

बोरगाव मंजूचे ‘रतन खत्री’ कोण ? स्मारक परिसरातील अवैध धंद्यांमुळे चर्चांना उधाण

माना पोलिसांची गावठी हातभट्टी अड्ड्यावर धाड; ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी ताब्यात

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!