Join WhatsApp group

Ads

--

“जंक्शन मोठे, महसूलही मोठा, पण ‘दुरंतो’ थांबा ‘उपेक्षित’!”अकोला जंक्शन: विकासाची अपेक्षा आणि रेल्वेची उदासीनता.

By Sarkarmzanews

June 2, 2025 8:12 pm

Ads

अकोला, २ जून २०२५: अकोला जंक्शन हे रेल्वेसाठी मोठे महसूल मिळवून देणारे आणि एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे.

असे असूनही, गेल्या अनेक वर्षांपासून अनेक महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना येथे थांबा न देणे हे रेल्वेच्या उत्पन्नाचे मोठे नुकसान करत आहे, असे मत अकोलेकर व्यक्त करत आहेत. २००९ पासून सुरू झालेल्या अनेक सुपरफास्ट आणि दुरंतो गाड्यांना अद्यापही अकोल्यात थांबा मिळालेला नाही, ही बाब विशेषतः खटकणारी आहे.

राजकीय इच्छाशक्तीचा अभाव की दुर्लक्ष?

२०१४ पासून, मधले अडीच वर्षांचा अपवाद वगळता, “गल्ली ते दिल्ली” सत्ता आपल्याच पक्षाची असतानाही अकोल्याला या गाड्यांचे थांबे मिळवता आले नाहीत, यावर नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. याउलट, अमरावतीचे खासदार सत्ताधारी पक्षात नसतानाही एप्रिल २०२३ पासून १२२८९/९० मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर दुरंतो एक्सप्रेसला थांबा मिळवण्यात यशस्वी झाले. ही बाब अकोल्याच्या प्रतिनिधींच्या राजकीय इच्छाशक्तीवर आणि त्यांच्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. दुरंतो आणि हमसफर सोडाच, किमान ३ सुपरफास्ट एक्सप्रेसला देखील अकोल्यात थांबा मिळवता आला नाही, हे अनाकलनीय आहे.

मतदारांच्या अपेक्षांचा भंग?

अकोल्यातील मतदारांनी २००४ पासून बहुमताने विकासाच्या आशेने लोकप्रतिनिधींना निवडून दिले. मात्र, रेल्वेच्या बाबतीत अकोल्याला मिळणाऱ्या सापत्न वागणुकीमुळे त्यांच्या अपेक्षांचा भंग झाल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. अकोल्यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी अनेक नवीन गाड्या सुरू होऊनही त्यांना थांबा न मिळणे हे येथील लोकप्रतिनिधींच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते.

या गाड्यांना अकोल्यात थांबा अपेक्षित:

खालील सात महत्त्वाच्या गाड्यांना अकोला जंक्शनवर थांबा मिळणे आवश्यक आहे, अशी मागणी अकोलेकर करत आहेत.

१२२६२/६१ हावडा – मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वातानुकूलित दुरंतो एक्सप्रेस: (प्रारंभ: सोमवार, २८ सप्टेंबर २००९) १२२८९/९० मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर दुरंतो एक्सप्रेस: (प्रारंभ: शनिवार, २१ नोव्हेंबर २००९) – (या गाडीला एप्रिल २०२३ पासून बडनेरा थांबा मिळाला आहे) २२८२७/२८ पुरी – सुरत साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस: (प्रारंभ: मंगळवार, १५ डिसेंबर २००९) २२८६५/६६ मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस – पुरी साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस: (प्रारंभ: गुरुवार, ०१ एप्रिल २०१०) १२२२१/२२ पुणे – हावडा वातानुकूलित दुरंतो एक्सप्रेस: (प्रारंभ: सोमवार, ११ ऑक्टोबर २०१०) १२९९४/९३ पुरी – गांधीधाम साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस: (प्रारंभ: सोमवार, १४ नोव्हेंबर २०११) २०८२१/२२ पुणे – सांतरागाछी हमसफर एक्सप्रेस: (प्रारंभ: शनिवार, ११ ऑगस्ट २०१८)या गाड्यांना अकोल्यात थांबा मिळाल्यास येथील प्रवाशांची मोठी सोय होईल, तसेच रेल्वेलाही चांगले उत्पन्न मिळेल. सरकारने आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अकोलेकरांना न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा आहे.

Related Article

जनावरचोरांचा धुमाकूळ! पशुपालकांचा सवाल – पोलिसांना चोर सापडत नाहीत की शोधले जात नाहीत?

मुर्तीजापूर तालुक्यासाठी आमदार यांचे दिलासादायक निर्णय; आधुनिक आरोग्य सेवांचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर

मुर्तीजापूरात धान्य घोटाळ्याचा भूकंप ? तपास यंत्रणांच्या हालचालींनी वाढली उत्सुकता : रेशन व्यवस्थेतील काळे धंदे उघड होणार?

“ठाणेदार गेले बदलीवर… पण मुर्तिजापूरकरांच्या मनातून जाणार नाहीत अजित जाधव!”

बोरगाव मंजूचे ‘रतन खत्री’ कोण ? स्मारक परिसरातील अवैध धंद्यांमुळे चर्चांना उधाण

माना पोलिसांची गावठी हातभट्टी अड्ड्यावर धाड; ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी ताब्यात

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!