Join WhatsApp group

Ads

१६ महिन्याचा चिमुकल्या लयम चांडकला हवी आहे आपली मदत, एक हात मानवतेचा समाजाने पुढे करावा.

By Sarkarmzanews

June 2, 2025 4:30 pm

Ads

०२ जून २५ : न्युज डेस्क : पिंपरी चिंचवड येथे राहणारे विवेक संजय चांडक व राधिका विवेक चांडक यांचा मुलगा चि. लयम ज्याने अजून नीट चालायलाही सुरुवात केली नाही, अजून “आई” म्हणायला शिकलाही नाही — आज SMA Type 2 या दुर्मिळ आणि जीवघेण्या आजाराशी लढतोय!

आता हा आजार नेमका काय आहे असे प्रश्न तुम्हाला पडले असेल.

स्पाइनल मस्क्युलर अ‍ॅट्रोफी (SMA) ही एक अनुवांशिक स्थिती आहे ज्यामुळे स्नायूंची कमकुवतपणा वाढत जातो. पाच उपप्रकार आहेत, जे तीव्रता आणि सुरुवातीच्या वयानुसार बदलतात. SMA वर कोणताही इलाज नाही, परंतु काही उपचारपद्धती आणि औषधे लक्षणे व्यवस्थापित करण्यास मदत करू शकतात.

लयमला वाचवण्यासाठी लागणारा Zolgensma नावाचा इंजेक्शन केवळ अमेरिकेत मिळतो… त्याची किंमत — तब्बल १४ कोटी रुपये!
आणि त्यासाठी फक्त ६ महिने उरलेत… कारण हे औषध त्याच्या २ वर्षाच्या आतच देणं आवश्यक आहे.

काही समाजसेवी संस्था याचा साठी प्रयत्न करीत आहे.

चिमुकल्या लयमसाठी… तुमचा थोडासा हातभार, त्याचं संपूर्ण आयुष्य वाचवू शकतो!”

एका आईचा आक्रोश… एका वडिलांचा थरथरता श्वास… आणि एका १५ महिन्यांच्या निष्पाप बाळाचं चाललेलं जीवन-मरणाचं युद्ध!

हा आजार लयमचे स्नायू हळूहळू बंद करत आहे…
त्याच्या प्रत्येक श्वासासाठी तो लढतोय…
आणि त्या लढ्याला साथ देण्यासाठी, तुमच्यासारख्या देवदूतांची गरज आहे!

त्यासाठी फक्त ६ महिने उरलेत… कारण हे औषध त्याच्या २ वर्षाच्या आतच देणं आवश्यक आहे.

त्याची आई दिवसभर डोळ्यात अश्रू आणि हृदयात आशा घेऊन बसलेली असते,
वडील प्रत्येक क्षण त्याच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहत म्हणतात, “मी तुला वाचवणार…”

पण हे स्वप्न पूर्ण होणार की नाही, हे तुमच्या एका छोट्याशा मदतीवर ठरू शकतं.

म्हणून करबद्ध विनंती आहे
“चि. लयमला जीवनदान द्या…
तुमचं थोडंसं देणं, त्याचं संपूर्ण आयुष्य बनू शकतं!”

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!