Join WhatsApp group

Ads

-

मंत्रालया समोर तरुणाचं झाडावर चढून आंदोलन

By Sarkarmzanews

January 24, 2025 5:59 pm

Ads

दिनांक २४ :मुंबई (प्रतिनिधी – अमर तळोकार) : मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेल्या झाडावर चढून एका तरुणानं आंदोलन सुरु केलं. ग्रामीण भागातून आलेला तरुण झाडावर चढल्यानंतर पोलिसांची तारांबळ उडाली. अग्निशमन दलाच्या जवानांना मंत्रालयाच्या बाहेर पाचारण करण्यात आलं. त्यांनी खाली जाळी धरली. दरम्यान पोलिसांकडून त्याला सातत्यानं खाली येण्याची विनंती करण्यात येत होती. अखेर १५ ते २० मिनिटांनी तो खाली उतरला.

मंत्रालय आणि त्याच्या आसपास मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असतो. या भागातील सुरक्षा व्यवस्था अतिशय चोख असते. अशा परिस्थितीत तरुण झाडावर चढून आंदोलन करु लागल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. पोलीस अधिकाऱ्यांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण तो ऐकत नव्हता. ‘तू खाली ये. आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना तुझी भेट घडवतो. तुझा प्रश्न मार्गी लावतो,’ असं पोलीस अधिकारी खालून ओरडत होते. पण तरुण बराच वेळ झाडावरच बसून होता.

झाडावर बसलेला तरुण त्याचा प्रश्न सांगत होता. पण तो उंचावर असल्यानं त्याचा आवाज नीटसा ऐकू येत नव्हता. ‘ग्राम पंचायतीत भ्रष्टाचार झालेला आहे. त्यातील दोषींवर कारवाई व्हावी यासाठी मी पंचायत समिती, जिल्हा परिषदेकडे गेलो. पण मला न्याय मिळाला नाही. मला न्याय हवा आहे,’ असं हा तरुण ओरडून ओरडून सांगत होता.

मंत्रालयाचा परिसर अतिसंवेदनशील मानला जातो. इथे तगडा बंदोबस्त तैनात असतो. पोलीस अधिकारी हजर असतात. असं सगळं असताना तरुण अचानक झाडावर कसा काय चढला, असा प्रश्न उपस्थित झाला. या घटनेबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. तरुणाला खाली आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना बोलवण्यात आलं. अनुचित प्रकार टाळण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि उपायुक्त घटनास्थळी पोहोचले.

तू खाली ये. आपण तुझा प्रश्न सोडवू, असं पोलीस अधिकारी सातत्यानं तरुणाला सांगत होते. त्यावर मला न्याय द्या, भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी तरुण करत होता. अखेर १५ ते २० मिनिटांनंतर हा तरुण झाडावरुन शेजारच्या पत्र्यावर गेला. त्यावर उभा राहून तो त्याच्या हातात असलेला कागद दाखवत होता. ग्राम पंचायतीमधील भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी तो करत होता.

Related Article

जनावरचोरांचा धुमाकूळ! पशुपालकांचा सवाल – पोलिसांना चोर सापडत नाहीत की शोधले जात नाहीत?

मुर्तीजापूर तालुक्यासाठी आमदार यांचे दिलासादायक निर्णय; आधुनिक आरोग्य सेवांचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर

मुर्तीजापूरात धान्य घोटाळ्याचा भूकंप ? तपास यंत्रणांच्या हालचालींनी वाढली उत्सुकता : रेशन व्यवस्थेतील काळे धंदे उघड होणार?

“ठाणेदार गेले बदलीवर… पण मुर्तिजापूरकरांच्या मनातून जाणार नाहीत अजित जाधव!”

बोरगाव मंजूचे ‘रतन खत्री’ कोण ? स्मारक परिसरातील अवैध धंद्यांमुळे चर्चांना उधाण

माना पोलिसांची गावठी हातभट्टी अड्ड्यावर धाड; ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी ताब्यात

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!