Join WhatsApp group

Ads

वंचित बहुजन आघाडी EVM विरोधात स्वाक्षरी मोहीम

By Sarkarmzanews

December 14, 2024 8:21 am

Ads

मुर्तीजापुर : दिनांक १४ : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी राज्यातील मतदारांना ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.ऍड.मा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, तसेच मा राजेंद्र दादा पातोडे यांच्या मार्गदर्शनात वरील मोहीम राबविणे बाबत श्रीकांत दादा घोगरे जिल्हाध्यक्ष राजकुमार दामोदर जिल्हा महासचिव यांच्या सुचना प्रात झाल्या त्यानुसार आज दि. 13/12/2024 रोजी वंचित बहुजन युवा आघाडी मुर्तीजापुर तालुक्याच्या वतीने परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक मुर्तीजापुर येथे ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.सदर स्वाक्षरी मोहिमेला मुर्तीजापुर तालुक्यातील सह आठवडी बाजारात आलेल्या ग्रामीण जनतेने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत स्वाक्षरी करून आपला विरोध दर्शविला.सदर स्वाक्षरी मोहीम राबविण्या करिता वंचित बहुजन युवा आघाडी वंचित बहुजन महिला आघाडी व वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!