Join WhatsApp group

विशेष अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांच्या निवडीची विधानसभेत घोषणा विधिमंडळ विशेष अधिवेशन २०२४

Photo of author

By Sarkarmzanews

Share

न्यूज डेस्क : मुंबई, दि. ८ : विधानसभेचे ७ ते ९ डिसेंबर या कालावधीत तीन दिवसीय विशेष अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. विधानसभा सदस्य कालिदास सुलोचना निळकंठ कोळंबकर यांची विशेष अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून निवड केल्याची घोषणा विधानसभेत करण्यात आली.

विशेष अधिवेशनात हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी नवनिर्वाचित सदस्य यांना सदस्यपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 173 विधानसभा सदस्यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!