Join WhatsApp group

आरक्षणवादी आघाडीचा मुर्तीजापुर येथे रवि राठी यांना पाठिंबा

Photo of author

By Sarkarmzanews

Share

प्रेमराज शर्मा – मुर्तीजापुर मतदारसंघात प्रहार जनशक्ती पक्षाचे पुरस्कृत उमेदवार रवी राठी यांना विविध स्तरातून पाठिंबा मिळत आहे त्यामुळे या निवडणुकीत रवी राठी आघाडीवर असल्याचे चित्र समोर दिसत आहे

मुर्तीजापुर मतदारसंघात गेल्या दहा वर्षापासून सामाजिक क्षेत्रात नावलौकिक असलेले रवी रमेशचंद्र राठी यांनी मागील विधानसभा निवडणुकीत 4200 हजार मताधिक्की घेऊन मतदारसंघात विजयाकडे घोडं दौड केली होती यावेळेस सुद्धा प्रहार जनशक्ती पक्षा तर्फे पुरस्कृत उमेदवार म्हणून रवी राठी यावेळेस मुर्तीजापुर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत रवी राठी यांच्या विविध कार्य पध्दतीने ते सर्वांना परिचित आहेत रवी राठी यांना रोज विविध संघटनांचा पाठिंबा मिळत आहे आज आरक्षणवादी आघाडी, ओबीसी बहुजन आघाडी, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्टिग पार्टी, जनहित लोकशाही पार्टी, ओबीसी एनटी पार्टी, मुस्लिम सेवा संघ यामधील सर्व आरक्षणवादी आघाडीचा रवि राठी यांना आज पाठिंबा मिळाला आहे आज आरक्षणवादी आघाडीचे प्रमुख प्रकाश अण्णा शेडगे यांनी पत्र काढत रवी राठी यांना विधानसभा निवडणुकीत जाहीर पाठिंबा केला आहे येणाऱ्या 20 तारखेला रवि राठी यांना बॅट समोरील बटन दाबून वोटिंग करण्यासाठी त्यांनी आवाहन सुद्धा केले आहे त्यामुळे यावेळेस रवी राठी यांची विजयाकडे वाटचाल आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!