Join WhatsApp group

Ads

सुगत वाघमारे यांना पहिल्या क्रमांकाची पसंती?

By Sarkarmzanews

November 15, 2024 8:26 am

Ads

प्रेमराज शर्मा – मूर्तिजापूर – विधानसभा निवडणुकीत दुसरे चर्चित असलेले उमेदवार जे छुप्या पद्धतीने दूर गेलेल्या समाज समाजाला अगदी सहजपणे जवळ करून आपला स्थिती भक्कम करण्याचे काम करत आहेत.

एवढेच नाही तर इतरही समाजातील ओबीसी सर्वात मोठा समाज असलेला मुस्लिम समाजही आता त्यांच्याकडे वळविण्यात त्यांना यश आला आहे.

त्यामुळे डॉक्टर सुगत वाघमारे यांची स्थिती सध्या चांगली म्हटल्या जात आहे . डॉक्टर सुगत वाघमारे आणि हरीश पिंपळे यांच्यातच लढत होणार असल्याचेही काही लोकांचं म्हणणे आहे.

डॉक्टर सुगत वाघमारे हा राजकारणातील नवीन चेहरा असल्यामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होत आहे आणि अजिबात खोटे आश्वासन नाही, पैशाचे आमिष नाही आणि जिल्ह्यातील सर्वात मोठा बिल्डर असूनही अजिबात कवडीचाही घमंड नाही.

अशा व्यक्तीने आपल्या स्वभावाने आपला समाज जवळ केला आणि इतर समाज असे जवळ करण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे त्यामुळे डॉक्टर सुगत वाघमारे ही सध्या चांगल्या स्थितीमध्ये आहेत.

विधानसभा निवडणुकीत २०१९ प्रमाणेच पक्षीय बलाबल असल्याने पुन्हा त्याच पक्षात लढत असल्याचे बोलल्या जाते, त्यामुळे गत निवडणुकीचे समीकरण असल्याने विविध गोटात राजकीय चर्चा रंगत आहेत.

निवडणुकीपूर्वी जो मतदार संघात कार्यक्रमाचा सपाटा सुरु केलेल्या उमेदवाराची हवा आता फुस्स झाल्याचे दिसत आहे.

कारण त्यांच्या फेकू कृत्यामुळे त्याच्या सभांची गर्दी ओसरल्याचे दिसत आहे. आता तो उमेदवार चवथ्या क्रमांकावर फेकल्या गेल्याचे सध्या दिसत आहे.

निवडून येणारा उमेदवार चक्क आता चवथ्या क्रमांवर गेल्याने आता त्याच डिपॉझिट वाचणार कि नाही अशी शंका मतदारांना आहे. सुरुवातीला मोठा पैशेवाला दाखवून सर्वच समाजातील लोकांना जवळ केलं, मात्र अनेकांना त्याच्या मूळ स्वभावाचे दर्शन होताच कार्यकर्ते दूर व्हायला लागले.

त्याच्या कार्यक्रमाला गर्दी पाहून त्याला पक्षाच तिकीट मिळाल. मात्र आता त्याच्या सोबतच गर्दी ओसरल्याचे दिसत आहे. आता पुन्हा नाराज कार्यकर्त्यांना जवळ करण्याची त्याची कला आता निकामी होणार आहे. याचा फायदा वंचितच्या उमेदवाराने घेतला असून या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना जवळ करून आपलं पाठबळ वाढवत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे वंचित सध्यातरी प्रथम क्रमांकावर असल्याचे लोक सांगतात.

Related Article

जनावरचोरांचा धुमाकूळ! पशुपालकांचा सवाल – पोलिसांना चोर सापडत नाहीत की शोधले जात नाहीत?

मुर्तीजापूर तालुक्यासाठी आमदार यांचे दिलासादायक निर्णय; आधुनिक आरोग्य सेवांचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर

मुर्तीजापूरात धान्य घोटाळ्याचा भूकंप ? तपास यंत्रणांच्या हालचालींनी वाढली उत्सुकता : रेशन व्यवस्थेतील काळे धंदे उघड होणार?

“ठाणेदार गेले बदलीवर… पण मुर्तिजापूरकरांच्या मनातून जाणार नाहीत अजित जाधव!”

बोरगाव मंजूचे ‘रतन खत्री’ कोण ? स्मारक परिसरातील अवैध धंद्यांमुळे चर्चांना उधाण

माना पोलिसांची गावठी हातभट्टी अड्ड्यावर धाड; ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी ताब्यात

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!