Join Whatsapp

भाजप तर नाही पण भाजपावालाच येणार

Photo of author

By Sir

Share

प्रेमराज शर्मा – राजकारण समुद्रा सारखं खोल, तो विषय रॉकेट विज्ञान सारखा सरळ नसतो पण राजकिय विज्ञान कोणाला समजले नाही कारण या मध्ये जातीपातीचे,अस्तित्वाचे, खानदानाचे,माणसाचे, पाठींब्याचे, अर्थाचे अशे अनेक मुद्दे असतात. त्यामुळे निवडणुकीचा वेळेस काही जास्तच रंग गर्द होत असतो, पण तो रंग किती पक्का असेल याची खात्री कोणी घेऊ शकत नाही.

अशीच परिस्थिती काहीशी झाली आहे अकोला पश्चिम विधानसभेची ३० वर्षानंतर यावर्षी आमदारकीचा जणू इथे पोळाच सुटला आहे असे चित्र अकोला पश्चिम दिसत आहे, भाजप पक्षाचीच विचारधारा घेऊन व भाजप पक्षाचीच सत्ता भोगून आता काही उमेदवार या मतदारसंघात आपल्याला पाहण्यासाठी मिळत आहे, जो तो उमेदवार लालाजिंचा फोटो लावून प्रचार करताना दिसत आहे.

बटेंगे तो कटेंगे, हेच आमचे गुरु इथूनच आमचा प्रचार सुरु, अब एक होणे का समय अश्या अनेक राजकीय चर्चा जनतेमध्ये दरोज एकण्यात येतात,पण नियमा प्रमाणे कोणी एक उमेदवार हि निवडणूक जिंकू शकणार हे पण जनतेला माहित आहे. पण अती उत्साही लोकांनी सध्या वेगवेगळ्या चर्चाना उधान देऊन निवडणुकीचा गोंधळ घालून ठेवला आहे.

संविधानने आपल्याला बोलण्याचे अधिकार दिले आहे तर आता कोणा बद्दल काय बोलाव.

प्रत्येक व्यक्ती कधीपण आपल्या व्यवसायाचा आधारे बोलत असतो, हे वैज्ञानिक नियम आहे, अशीच चर्चा एक अकोल्यातील ज्योतिषी सोबत झाली असताना त्यांनी ज्योतिषशास्त्राचा हिशोबाने सांगितली अकोला पश्चिम मध्ये भाजप तर नाही पण भाजपावालाच निवडून येणार, हे व्यक्तिमत्व फक्त ज्योतिषी नसून राजकारणाचे छुपे खेळाडू आहे अशी त्यांची जिल्ह्यात ओळख आहे.

पण सध्या अकोला पश्चिमचे चित्र विचित्र आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!