Join WhatsApp group

Ads

भाजप पकडत आहे हळू हळू पिकप

By Sarkarmzanews

November 8, 2024 9:32 pm

Ads

प्रेमराज शर्मा – विधानसभे निवडणुकीचे राजकीय रंग हळूहळू गर्द होत चालले आहे, मुर्तीजापुर बार्शीटाकळी मतदारसंघ 32 मध्ये यावेळेस आमदार हरीश पिंपळे यांच्या वरती जनतेची खूप नाराजी दिसून आली होती तसेच पक्षाकडून पण केलेल्या सर्वे मध्ये त्यांना निगेटिव्ह मार्किंग मिळाली होती.

त्याच राजकीय संधीचा फायदा घेत रवी राठी यांनी पण आपले डाव भाजपमध्ये साधून बघितले ते डाव 99% पूर्ण झाल्याचे दिसून आले होते, पण काही फटाके रवी राठी यांनी अति घाई मध्ये फोडल्यामुळे ते परत त्यांच्याच अंगावर आल्याचे दिसत आहे. त्याच फटाक्यांचं आवाज ऐकून हरीश पिंपळे यांची झोप उडाली.

यावेळेस पण मलाच उमेदवारी मिळणार असे त्यांना भ्रम होते पण रवी राठी यांच्या फटाक्यांच्या आवाजाने हरीश पिंपळे यांचे भ्रम तुटले, मग हरीश पिंपळे यांनी आपली यंत्रणा रातोरात कामाला लावली असून त्यांच्या सहकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा त्यांच्या उमेदवारीसाठी मोलाचा वाटा दिसून आला. आता हरीश पिंपळे यांनी उमेदवारी कशी आणली हे अध्याप ही गुलदस्त्यात आहे.

पण उमेदवारी मिळाल्यावर हरीश पिंपळे यांनी आपली निवडणुकीचे कार्यक्रम नियोजित पद्धतीने सुरू केले असून त्याचे पडसाद मतदार संघात आता बघायला भेटत आहे, तसेच मागील पंधरा वर्षाचा निवडणुकीचा अनुभव त्यांना आहे, त्यांच्या पाठीमागे मतदार संघातल्या खूप अदृश्य शकत्या कामाला लागले आहे, व हरीश पिंपळे यांनी मधून पॉझिटिव्ह मध्ये आल्याचे मतदारसंघात समजते त्याचे कारण दुसऱ्या पक्षांचे पण काही नेतेमंडळी छुप्या पद्धतीने भाजपाचा काम करत तर नाही ना? अशी चर्चा सध्या मतदारसंघात रंगली आहे.

Related Article

जनावरचोरांचा धुमाकूळ! पशुपालकांचा सवाल – पोलिसांना चोर सापडत नाहीत की शोधले जात नाहीत?

मुर्तीजापूर तालुक्यासाठी आमदार यांचे दिलासादायक निर्णय; आधुनिक आरोग्य सेवांचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर

मुर्तीजापूरात धान्य घोटाळ्याचा भूकंप ? तपास यंत्रणांच्या हालचालींनी वाढली उत्सुकता : रेशन व्यवस्थेतील काळे धंदे उघड होणार?

“ठाणेदार गेले बदलीवर… पण मुर्तिजापूरकरांच्या मनातून जाणार नाहीत अजित जाधव!”

बोरगाव मंजूचे ‘रतन खत्री’ कोण ? स्मारक परिसरातील अवैध धंद्यांमुळे चर्चांना उधाण

माना पोलिसांची गावठी हातभट्टी अड्ड्यावर धाड; ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी ताब्यात

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!