Join WhatsApp group

Ads

उमेदवारी मागे घेण्यासाठी ८ लाख ?

By Sarkarmzanews

November 5, 2024 1:56 pm

Ads

प्रेमराज शर्मा – ५/११/२४ – मुर्तीजापुर बार्शिटाकली मतदार संघात एकूण २९ उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगा कडे दाखल करण्यात आले होते . निवडणूक आयोगा कळून ४ नोव्हेंबर २४ मागे घेण्याची अतिंम तारीख होती.

२९ उमेदवारा मध्ये जास्त गर्दी त्यांची होती, ज्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली. त्यामधील काही इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करून पक्षाचा लक्ष आपल्या कडे ओळतात, तर काही आपली पावर दाखवण्यासाठी, भविष्यात आपल्याला पक्षा कडून किवा उमेदवार काही तरी फायदा करून घेऊ या साठी अर्ज भारतात. काही तर राजकारणाला आपला धंदा बनवला असून निवडणुकीचा वेळी अर्ज भरून परत घेण्याचा त्यांचा धंदा असतो.

जर काही अर्ज मागे नाही झाले तर याचा फटका महाविकास आघाडी, महायुती, व वंचितला बसण्याची शक्यता होती.

काल एकूण १६ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले असून त्या मधील एक पक्षाने चक्क ९ उमेदवाराना ८ लाख रुपये प्रती उमेदवाराला दिल्याची चर्चा जनते मध्ये सुरु आहे. आता कमी वेळेत या उमेदवारांनी लोकशाहीचा गैर वापर करून आपला जास्त फायदा तर नाही करून घेतला ना ?

आता ते ९ उमेदवार कोण आणि कोणत्या पक्षा साठी निवडणुकीत काम करणार हे जनतेला येणाऱ्या निवडणुकीत माहित पडेल.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!