Join WhatsApp group

Ads

काल ची ताजा खबर

By Sarkarmzanews

October 30, 2024 12:45 pm

Ads

प्रेमराज शर्मा – ३० ऑक्ट.२४ – काल निवडणूक अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती, अनेक दिवसांनी रवी राठी,हरीश पिंपळे या दोंघानी तर अक्षरशः मतदार संघाची झोप उडविली होती. दिवस उजिडला कोणी ढोल ताशे आणले , कोणी दिंड्या , तर कोणी डीजे, आप आपल्या नेत्याचे समर्थक शहरात दाखल झाले. कोणत्या नेत्याचा पक्षात गर्दी होती तर कोणत्या पक्षात दर्दी माणसं होती. कोणी तर एकटे येऊन नामांकन कदी दाखल करून गेले माहित पण पडले नाही.

काल शहरात एका नेत्याने युवकांना आकर्षित करण्यासाठी भाड्याने पोरी सुद्धा नाचवल्या तर कोणी भजन मंडळी आणली असो.

मूर्तिजापूर मधल्या वाइन बार मधे दोन ते तीन बसायला जागा सुद्धा नव्हती अशी परिस्थिती शहरात होती.

एका उमेदवाराने जनतेला मूर्ख बनवण्यासाठी समाजसेवक होण्याचे सोंग आजपर्यंत रचले होते. आज खरी त्यांची समजसेवा माहीत पडली. ज्यां समाजाची सेवा आज पर्यंत त्यांनी केली त्याच समाजाने प्रत्येकी एक हजार माणुस घेऊन हजेरी लावली अशी सूत्रांची माहिती आहे.

काही उमेदवारच काम झाल्यानंतर त्यांचा समर्थकांना चहा सुद्धा विचारले नाही.

काल एका पक्षाचा कार्यालया समोर गाड्या पार्किंग करायला जागा नव्हती तर दुसऱ्या पक्षाचा कार्यालय समोर गाड्या पार्क करण्यात आल्या आणि त्या ड्रायव्हर लोकांनी आपले गाडी भाडे दोन्ही कडून घेतल्याचे समजते.

अनेक दिग्गजांनी काल उमेदवारी अर्ज भरले आणि आपल्या उज्वल भविष्या साठी लोकशाहीचा आधार घेतला पण मात्र या सगळ्या गोष्टीचा ताण पोलिस प्रशासनावर पण मात्र आपला काम पोलिस प्रशासनाने खूप नियोजित पद्धतीने सांभाळून सगळी गर्दी खूप चांगल्या पद्धतीने हाताळली.

तसेच निवडणूक आयोग व अधिकार्यांनी आपले काम खूप सुव्यवस्थित पद्धतीने पार पाडले.

माहिती देण्या सारखे खूप काही आहे पण सगळ सांगता येत नाही.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!