Join WhatsApp group

Ads

आज पासून चप्पल बुट सोडले.

By Sarkarmzanews

October 29, 2024 2:21 am

Ads

प्रेमराज शर्मा – २९ ऑक्टो २४ – मी आपला सम्राट सुरवाडे सरकार माझा न्युजचा माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो, कि मी एक अत्यंत गरीब वंचित शोषित परिवारातून आहे, निस्वार्थ सेवा केल्यावर कर्माचे फळ आयुष्यात प्रकृती नेहमी देत असते असे माझे विश्वास आहे.

मी अनेक गोर गरिबांची जनसेवा केली असून त्यांचा आशीर्वादाने भौतिक जीवनात सदा सुखी आहे, त्या आशीर्वादाने मला कुठलीच कमी पळू दिली नाही.

मी भरपूर पैसा कमविला व माझा गरजा पूर्ण केल्या नंतर भिम योद्धा संस्थेची स्थापना करून उर्वरित पैशातून अनेक सामाजिक कार्य केले, सामाजिक कार्याची नशा मला चढत गेली आणि त्या नशेत रहाणे मला आनंददायी वाटायचे, नंतर माझा लक्षात आले कि एक संस्थेच्या माध्यमातून मी अनेकांना त्यांचा न्याय मिळवून देऊ शकत नाही तर धाडस करून राजकारणात आलो, व गरीब,वंचित ,शोषित,पिढीत जनतेला न्याय मिळावो या साठी प्रयत्न करत आहो.

सम्राट सुरवाडे अकोला मध्ये जिल्हा रुग्नालयात आल्यावर खर्या अर्थाने समजेल.

आता फक्त एक विनंती समाज सेवेची नशा अधिक वाढविण्यासाठी आज मी मुर्तीजापुर मतदार संघ -३२ मधून AIMIM पक्षा कडून उमेदवारी अर्ज दाखल करत आहे, आपल्याला भिक मागतो कि माझा अर्ज दाखल करण्यासाठी सकाळी १० वाजता प्रजापती लेआउट वरून मी निघणार आहे तरी आपण हजारोच्या संखेत उपस्थित राहावे, आणि मला या नशेत आयुष्य भर राहू द्यावे.

जेव्हा पर्यंत मला गरीब शोषित वंचित परिवारातला कोणी आमदार होऊन विधानसभेत पोहचत नाही तेव्हा पर्यंत मी माझा पायात बुट चप्पल घालणार नाही, कारण जेव्हा जेव्हा मला पायाला चटके बसतील व काटे रुततील, माझा पायाला वेदना होणार त्या वेदना मला गरीब शोषित वंचितानचा समस्याची जान करून देणार.

तुमचा सम्राट दादा सुरवाडे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!