Join WhatsApp group

Ads

जय प्रहार – गरीबांचा सेवेसाठी रवी राठी – प्रहार पक्षा कडुन उमेदवारी अर्ज आज दाखल करणार

By Sarkarmzanews

October 29, 2024 12:47 am

Ads

प्रेमराज शर्मा – २९ ऑक्ट.२४ – मी रवी राठी आजपर्यंत आपल्यासाठी अहो रात्र झटून समाज सेवा केली आहे, त्या मध्ये शेतकरी आंदोलन असो, युवकांचे रोजगाराची अडचन असो किंवा अन्नदानाची सेवा, वृद्ध लोकांची सेवा असे अनेक आंदोलन व समाज सेवा मी जनतेचा हिता साठी केले असून माझे सर्वस्व समाजाला दिले आहे.

जर भविष्यात जनहिता साठी मला भ्रष्टाचार रुपी कोणत्या रावणाचा खून जरी करून तुरुंगात जावे लागले तर रवी राठी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी तो पण गुन्हा करेल, सध्या हि वेळ निवडणुकीची असून जनतेचा हिता करिता मी प्रहार पक्षा कडून लढण्याचा इच्छुक आहे.

अनेक राजकीय पक्षांनी राजकीय स्वार्था साठी मला आजपर्यंत खूप वापरून घेतले, माझी जनतेचा सेवेची तडफड पाहुन बच्चु भाऊंनी आज मला संधी दिली .

मुर्तीजापुर बार्शीटाकळी विधानसभा क्षेत्रातील मतदार बंधु आणि भगीनीनों, मुर्तीजापुर बार्शीटाकळी विधानसभा मतदारसंघात करत असलेल्या कामांची त्रुटी पुर्ण करण्यासाठी म्हणून अपक्ष लढण्याची हिम्मत मला अनेक राजकीय दिग्गजांनी पाठिंबा अप्रत्यक्ष रित्या देवून दर्शवली आहे, पण माय माउली जनताच माझी खरी ताकत आहे हे मला माहित आहे.

मुर्तीजापुर बार्शीटाकळी विधानसभा क्षेत्रातील प्रिय मतदार बंधु आणि भगीनीनों तुम्हा जनतेसोबत माझं नातं अतूट आणि हक्काचं आहे, हे अतूट नातंच माझी ताकद आहे. हीच ताकद आणि मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद, माय माउली बहिणींचे प्रेम, युवा मित्रांची साथ सोबत घेऊन विधानसभा निवडणूक २०२४ करीता मी तयार आहो.

मुर्तीजापुर बार्शीटाकळी विधानसभा मतदारसंघातून प्रहार पक्षाचा उमेदवार म्हणून बॅट मला चिन्ह प्राप्त झाले, त्यावर निवडणूक लढण्यासाठी मी २९ ऑक्टोबर रोजी नामांकन अर्ज दाखल करत आहे.आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मला साथ द्यावी ही विनंती.

गोरगरीब जनतेची बॅट हाती घेऊन भ्रष्टाचाराचा चेंडूला मैदाना बाहेर काढेल – रवी राठी

आपला जनसेवक- रवी राठी

नामांकन अर्ज रॅली : दिनांक २९ ऑक्टोबर २०२४

वेळ – सकाळीं १० वा.

स्थळ – राधा मंगलम कार्यालय, बी.टी. मॉल जवळ पासुन ते उपविभागीय अधिकारी कार्यालय, मुर्तीजापुर

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!