Join WhatsApp group

Ads

नमस्कार मंडळी मी आपला राजेश मिश्रा बोलतोय

By Sarkarmzanews

October 28, 2024 11:28 pm

Ads

प्रेमराज शर्मा – २८ ऑक्ट.२४ – मी राजेश मिश्रा आजपर्यंत आपल्यासाठी अहो रात्र झटून समाज सेवा केली आहे, त्या मध्ये घरकुल लाभार्थीचा मुद्दा असो किंवा कर वाढी मुद्दा असो नाही तर स्वच्छ पाण्यासाठीची अडचन असो असे अनेक आंदोलन मी जनतेचा हिता साठी केले असून अनेक गुन्हे माझा पदरात पाडले आहे.

जर जनहिता साठी मला भ्रष्टाचार रुपी कोणत्या रावणाचा खून जरी करून तुरुंगात जावे लागले तर राजेश मिश्रा लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी तो पण गुन्हा करेल, सध्या हि वेळ निवडणुकीची असून जनतेचा हिता करिता मी अपक्ष लढण्याचा इच्छुक आहे.

अकोला पश्चिम विधानसभा क्षेत्रातील मतदार बंधु आणि भगीनीनों, अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात करत असलेल्या कामांची पोचपावती म्हणून अपक्ष लढण्याची हिम्मत मला अनेक राजकीय दिग्गजांनी पाठिंबा अप्रत्यक्ष रित्या देवून दर्शवली आहे, पण माय माउली जनताच माझी खरी ताकत आहे हे मला माहित आहे.

अकोला पश्चिम विधानसभा क्षेत्रातील प्रिय मतदार बंधु आणि भगीनीनों तुम्हा जनतेसोबत माझं नातं अतूट आणि हक्काचं आहे, हे अतूट नातंच माझी ताकद आहे. हीच ताकद आणि मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद, माय माउली बहिणींचे प्रेम, युवा मित्रांची साथ सोबत घेऊन विधानसभा निवडणूक २०२४ करीता मी तयार आहो.

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून जो पण मला चिन्ह मिळेल त्यावर निवडणूक लढण्यासाठी मी २९ ऑक्टोबर रोजी नामांकन अर्ज दाखल करत आहे.आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मला साथ द्यावी ही विनंती.

आपला जनसेवक- राजेश मिश्रा

नामांकन अर्ज रॅली : दिनांक २९ ऑक्टोबर २०२४

वेळ – सकाळीं १० वा.

स्थळ – अकोलाचे आराध्य दैवत राज्रेश्वर मंदिर यांचा चरणा पासून तर अकोला जिल्हा अधिकारी कार्यलया पर्यंत.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!