Join WhatsApp group

सेना भी तैयार सेनापतीची नियुक्ती बाकीच…..

Photo of author

By Sarkarmzanews

Share

प्रेमराज शर्मा – २४ ऑक्टो. २४ – मुर्तीजापुर बर्शिटाकळी विधानसभे मध्ये थोडा जनतेला धीर आला आहे, कारण वंचित वरून सुगत वाघमारे, AIMIM वरून सम्राट सुरवाडे, तसेच राष्ट्रवादी श.प. गटाकडून सम्राट डोंगेरदिवे, अधिकृतरित्या पक्षाने उमेदवारी जाहीर झाली आहे.

पण सध्या भा.ज.प. मधून कोणती उमेदवारी साठी अधिकृत घोषणा झाली नसून सगळ्या मतदार संघाची नजर भा.ज.प. च्या उमेदवार वर टिकली आहे, जनतेस अशी चर्चा आहे कि भा.ज.प. पक्ष या वेळेस हरियाना मध्ये जसे जुने चहेरे बदलून नवीन चहेरे निवडणुकीत उभे केले होते त्यमुळे भा.ज.प. पक्षाने हरियानात निवडणुकीचा परिणामाचा आलेख दुप्पटीने वाढविला होता, तसेच कदाचित महाराष्ट्र मध्ये होईल का ? मुर्तीजापुर विधानसभेतपण नवीन चहेरा बघायला मिळेल का ?

सूत्रांचा माहिती प्रमाणे मुंबई येथे श्रावण इंगळे, राजश्री बोलके, परिमल कांबळे सध्या तळ ठोकून बसले आहे, या मध्ये यांना जिल्ह्यातील काही विशेष भा.ज.प. नेत्यांनी श्रावण इंगळे यांचा नावाची शिफारस पक्ष श्रेठीन कडे केली आहे, तसेच या वर सध्या मुंबई मध्ये चर्चा सत्र सुरू आहे.

पण हरीश पिंपळे हे राजकारणातले कच्चे खिलाडी नसून त्यांनी पण मजबूत फिल्डिंग लावल्याचे समजते.

आता विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांना उमेदवारी मिळेल का? अशी चर्चा सध्या मुर्तीजापुर मतदार संघात रंगली आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!